Chandra Grahan 5 June 2020: कुठे आणि किती वाजता दिसणार ग्रहण?

Chandra Grahan 5 June 2020: कुठे आणि किती वाजता दिसणार ग्रहण?

शुक्रवारी रात्री होणारं छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे.

  • Share this:

मुंबई, 05 जून : या वर्षी 30 दिवसांमध्ये तीन ग्रहणं पाहण्याचा योग येणार आहे. त्यापैकी पहिलं ग्रहण शुक्रवारी खगोलप्रेमींना पाहता येणार आहे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे.

चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट सावलीभोवती असलेल्या विरळ सावलीतून जेव्हा जाते त्यावेळी छायाकल्प चंद्रग्रहण दिसतं. याला मांद्य चंद्रग्रहण- Penumbral Eclipse असंही म्हणतात. भारतातून हे चंद्रग्रहण शुक्रवारी रात्री 11 वाजून 13 मिनिटांपासून ते उत्तररात्री 2 वाजून 37 मिनिचांपर्यंत असणार आहे. हे ग्रहण ऑस्ट्रेलिया,यूरोप, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व दक्षिण प्रदेशातही दिसणार आहे.

यावेळी लागोपाठ तीन ग्रहणे होत असल्याने ती अशुभ असल्याने काहीतरी वाईट घटना घडतील असे भाकीत काही ज्योतिषानी वर्तविले आहे त्यात काहीही तथ्य नसल्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. यापूर्वी सन २०१८ मध्येही लागोपाठ तीन ग्रहणे झाली होती . त्यावेळी काहीही वाईट घटना घडल्या नव्हत्या तसेच यानंतर सन 2029 मध्येही लागोपाठ तीन ग्रहणे होणार असल्याची माहिती श्री. दा. कृ. सोमण यांनी दिली.

First published: June 5, 2020, 8:06 AM IST
Tags:

ताज्या बातम्या