Home /News /national /

फाटक पडलं असतानाही नेली बाईक; एक्स्प्रेसने 2 जणांना चिरडलं, पाहा थरारक VIDEO

फाटक पडलं असतानाही नेली बाईक; एक्स्प्रेसने 2 जणांना चिरडलं, पाहा थरारक VIDEO

निष्काळजीपणे बंद फाटक क्रॉस करणाऱ्या 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    लुधियाना, 01 मार्च : अनेकवेळा बंद फाटक क्रॉस करून जाऊ नये किंवा क्रॉसिंग करताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केलं जातं. मात्र तरीही अनेक गावांमध्ये फाटक ओलांडण्याचे प्रकार घडतात. लुधियान-दिल्ली रेल्वे मार्गावर ग्यासपुरा इथे फाटकाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. लुधियाना इथे निष्काळजीपणाने फाटक क्रॉस करत असताना अचानक शताब्दी एक्स्प्रेस आली. ट्रेनखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले. निष्काळजीपणे बंद फाटक क्रॉस करणाऱ्या 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेचं फाटक उघडं होतं त्यामुळे तिथून अनेक जण क्रॉस करत होते. फाटक बंद असतं तर ही दुर्घटना घडली नसती. त्यामुळे या दुर्घटनेला संपूर्ण रेल्वे प्रशासना जबाबदार असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. फाटक बंद असतानाही लोक जीवाची पर्वा न करता निष्काळजीपणे फाटक क्रॉस करताना दिसत आहेत. हे वाचा-5 मार्चपर्यंत पडणार पाऊस; महाराष्ट्रात गारा, वादळी वाऱ्याचा तडाखा या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की अनेक जण इथे फाटक उघडण्याची वाट पाहात उभे आहेत. मात्र घाईत असणाऱ्या एक दुचाकीस्वारानं आपली दुचाकी फाटकातून आतमध्ये नेली आणि क्रॉस करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात समोरून भरधाव शताब्दी एक्स्प्रेस आली आणि दुर्घटना घडली. ही दुर्घटना शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमाराम घडल्याचं सांगितलं जात आहे. शताब्दी एक्सप्रेस ट्रेन दिल्लीहून अमृतसरला जात होती. त्याचवेळी निष्काळजीपणानं रेल्वे रूळ क्रॉस करणारे रेल्वेखाली चिरडले गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी अमृतसरमध्येही अशा पद्धतीची घटना समोर आली होती. रावण दहन कार्यक्रमासाठी रेल्वे ट्रॅकवर उभ्या असणाऱ्या लोकांना एक्स्प्रेसनं चिरडलं होतं. त्यावेळी या दुर्घटनेत जवळपास 60हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. रेल्वे ट्रॅकवर उभं राहाणं किंवा अशा पद्धतीनं क्रॉस करणं हे आपल्या जीवावर बेतू शकतं हे माहीत असूनही अनेकदा घाईत निष्काळजीपणानं असे प्रकार घडताना दिसतात. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही अशा पद्धतीचा घटना समोर येत आहे. हे वाचा-स्वरा भास्करच्या अडचणीत वाढ, राजद्रोहाचा गुन्हा केला दाखल
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Amritsar, Amritsar accident, Ludhiana, Punjab news

    पुढील बातम्या