मतदान होताच भाजपने मंत्रिमंडळातून 'या' नेत्याची केली हकालपट्टी!

मतदान होताच भाजपने मंत्रिमंडळातून 'या' नेत्याची केली हकालपट्टी!

लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान होताच उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

लखनऊ, 20 मे: लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान होताच उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल राम नाईक यांना ओमप्रकाश राजभर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांची ही विनंती राज्यपालांनी मान्य केली आहे.

लोकसभा निवडणुकीचे मतदान होताच भाजप आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष (सुभासपा)यांची युती अखेर संपुष्ठात आली आहे. भाजप आणि योगी सरकारने राजभर यांच्यापासून वेगळ होण्याचे निश्चित केले होते. योगी मंत्रिमंडळात राजभर मागस वर्ग विकास आणि दिव्यांग विकास मंत्री होते. राजभर यांना तातडीने मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले आहे. योगी सरकारच्या या निर्णयावर राजभर यांनी सांगितले की, हा निर्णय त्यांनी 20 दिवस आधी घेतला पाहिजे होता. राजभर यांनी त्यांच्या हकालपट्टीचे स्वागत करत मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी राजभर यांना मंत्रिपदाबरोबरच अन्य महामंडळाच्या अध्यक्षपदावरून हटवले आहे.

विशेष म्हणजे याआधी राजभर यांनी स्वत:हून राजीनामा दिला होता. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात भाजपने राजभर यांच्या पक्षाला एकही जागा दिली नव्हती. त्यामुळे नाराज झालेल्या राजभर यांनी राजीनामा दिला होता. तसेच लोकसभेसाठी उत्तर प्रदेशमधून 36 उमेदवार देखील उभे केले होते. सातव्या टप्प्यातील प्रचारा दरम्यान त्यांनी भाजपला शिवीगाळ केली होती. यावरुन त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

VIDEO: पार्थ पवारांचं काय होणार? शेकाप नेते जयंत पाटील म्हणतात...

First published: May 20, 2019, 11:55 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading