News18 Lokmat

योगी सरकारचा मोठा निर्णय, IND-WI सामन्याआधीच बदलले स्टेडियमचे नाव!

योगी सरकारने इकाना स्टेडियमचे नाव बदलून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असं नामकरण केलं आहे

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2018 08:48 PM IST

योगी सरकारचा मोठा निर्णय, IND-WI सामन्याआधीच बदलले स्टेडियमचे नाव!

उत्तरप्रदेश, 05 नोव्हेंबर : योदी आदित्यनाथ सरकारने नामकरणाचा धडाका लावला आहे. आता तर त्यांनी राजधानी लखनऊ येथील इकाना स्टेडियमचे नाव बदलून टाकले आहे. इकाना स्टेडियमच्या नामकरणाला राज्यपालांनीही मंजुरी दिली. योगी सरकारने भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान सामन्याच्या आधीच स्टेडियमचे नाव बदलले आहे.योगी सरकारने इकाना स्टेडियमचे नाव बदलून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असं नामकरण केलं आहे.  आता इकाना स्टेडियमला भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाणार आहे.


Loading...

विशेष म्हणजे, लखनऊमध्ये २४ वर्षांनंतर इथं इंटरनॅशनल क्रिकेट सामना रंगणार आहे. राजधानी इकाना स्टेडियममध्ये ६ नोव्हेंबरला भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान दुसरा टी-२० सामना खेळवला जाणार आहे. आता हा सामना अधिकृतरित्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2018 08:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...