यूपी महापालिका निवडणुकीत 'हाथी'ची धडाकेबाज एंट्री, 'सायकल' पंक्चर !

यूपी महापालिका निवडणुकीत 'हाथी'ची धडाकेबाज एंट्री, 'सायकल' पंक्चर !

उत्तरप्रदेशमधील महापालिका निवडणुकीत मायावती यांच्या बसपा पक्षाला नव संजीवनी मिळालीये. 16 पैकी 2 ठिकाणी विजय मिळवत बसपाने सत्तारूढ भाजपला टक्कर दिलीये

  • Share this:

01 डिसेंबर : उत्तरप्रदेशमधील महापालिका निवडणुकीत मायावती यांच्या बसपा पक्षाला नव संजीवनी मिळालीये. 16 पैकी 2 ठिकाणी विजय मिळवत बसपाने सत्तारूढ भाजपला टक्कर दिलीये. तर विरोधीपक्ष सपाला इथं भोपळाही फोडता आला नाही.

बसपाने अलीगड आणि मेरठच्या जागेवर कब्जा मिळवलाय. अलीगडमधून मोहम्मद फुरकानने भाजपचे उमेदवार राजीव अग्रवाल यांना 11 हजार मतांनी पराभूत केलंय तर मेरठमध्ये सुनीता वर्मा यांनी भाजपच्या उमेदवार कांता करदम यांचा पराभव केलाय.

या संपूर्ण निवडणुकीत आश्चर्याची गोष्टमध्ये मुख्य विरोधीपक्ष समाजवादी पक्षाला भोपळा सुद्धा फोडता आला नाही. विशेष म्हणजे बसपाचा मतदार हा बहुतांश ग्रामीण भागातला आहे. पण महापालिका निवडणुकीतही बसपाच्या हाथीने एंट्री घेतलीये. महापालिका निवडणुकीत भाजपने बहुमतासह सत्ता स्थापन केली आहे. पण बऱ्याच ठिकाणी बसपाने कडवी झुंज दिलीये. आग्रा, झांशी, सहारनपूर आणि फिरोजाबादसह अन्य ठिकाणी बसपाच्या पारड्यात चांगली मतं मिळाली.

ईटीव्ही यूपीचे पाॅलिटिकल एडिटर मनमोहन राय यांनी या निवडणुकीचं विश्लेषण केलंय. या निवडणुकीत भाजप विरुद्ध सपा अशी लढत होणार असा स्पष्ट अंदाज होता. पण बसपाने मुसंडी मारत भाजपला टक्कर दिलीये.

मनमोहन राय पुढे म्हणाले, बसपाच्या वाट्याला दोन जागा आल्या असल्या तरी त्यांच्या दलित व्होट बँकला धक्का पोहोचला नाही. तसंच मुस्लिम मतांवर डोळा ठेऊन असलेल्या सपा आणि काँग्रेसला सपशेल अपयश आलंय. मुस्लिम मतदारांनी सपा, काँग्रेसला टाळून बसपाला मतदान केलंय. दोन जागेवर आलेला हा विजय बसपाच्या कार्यकर्त्यांना संजीवनी देणारा ठरलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2017 06:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading