S M L

'नाईट क्लब'च्या उद्घाटनामुळं साक्षी महाराज वादात

कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा आणि कायम आपल्या वक्तव्यानं वाद निर्माण करणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज एका नाईट क्लबच्या उद्घाटनामुळं वादात सापडले.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 16, 2018 10:17 PM IST

'नाईट क्लब'च्या उद्घाटनामुळं साक्षी महाराज वादात

लखनऊ,ता.16 एप्रिल: कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा आणि कायम आपल्या वक्तव्यानं वाद निर्माण करणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज एका नाईट क्लबच्या उद्घाटनामुळं वादात सापडले.

लखनऊमध्ये एका नाईट क्लबचं महाराजांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यानंतर ही बातमी जशी सोशल मीडियावर पसरली तशी महाराजांची लोकांनी साक्ष काढली. काहींनी तर ‘नाइट क्लब वाले बाबा’ असं म्हणायला सुरवात केल्यानं शेवटी साक्षी महाराजांना जाग आली आणि त्यांनी स्पष्टीकरण दिलं.

खोटं सांगून आपल्याला बोलावण्यात आलं. रेस्टॉरंटचं उद्घाटन करण्यासाठी निमंत्रण होतं असं साक्षी महाराज म्हणाले. महाराजांनी कितीही स्पष्टीकरणं दिलं असलं तरी जी लाज जायची ती गेलीच अशी प्रतिक्रिया भाजपच्या अनेक नेत्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर दिलीय. साक्षी महाराज हे उन्नावचे खासदार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 10:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close