चला, आता जीएसटी शिकू या!

चला, आता जीएसटी शिकू या!

लखनऊ विद्यापीठ जीएसटीवर एक सहा महिन्यांचा कोर्स सुरू करणार आहे.

  • Share this:

09जुलै: जीएसटीबद्दल लोकांच्या मनात देशभर सध्या भरपूर संभ्रम आहे. जीएसटी म्हणजे नक्की काय हे फार कमी लोकांना सांगता येईल. म्हणूनच लखनऊ विद्यापीठ जीएसटीवर एक सहा महिन्यांचा कोर्स सुरू करणार आहे.

हा कोर्स सुरू करण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मांनी घेतलाय. या कोर्सचे फॉर्म 1 आॅगस्टपासून मिळणार आहेत. हा कोर्स एक 4 क्रेडिटचा कोर्स असेल ज्यातले दोन क्रेडिट कौशल्य विकास तर दोन क्रेडिट जीएसटीच्या थिअरीला दिलेले आहेत. याशिवाय विद्यापीठ जीएसटीवर दोन सेमिनार टॅक्स आॅफिसर्स, अकाउंटंटस आणि कन्सलटंटससाठी घेणार आहे.

जीएसटी फक्त लखनऊ विद्यापीठ शिकवणार नाहीय. तर टॅक्स क्षेत्रात काम करणाऱ्या प्रोफेशनल्ससाठी कौशल्य विकास मंत्रालयाने 100 तासांचा सर्टिफिकेट कोर्स जाहीर केलाय. हा कोर्स दिल्ली ,बेंगलुरु आणि भोपाळ या 3 शहरांमध्ये घेतला जाणार आहे. या कोर्सची घोषणा के.पी .कृष्णन यांनी केली.

जीएसटीबद्दलचं देशातील लोकांचं अज्ञान पाहता अशा कोर्सेसची देशाला सध्या नितांत गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2017 02:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading