...नाहीतर राजभवन डायनामाईटने उडवून देऊ, माओवाद्यांची धमकी

...नाहीतर राजभवन डायनामाईटने उडवून देऊ, माओवाद्यांची धमकी

झारखंडच्या माओवादी संघटनेने हे पत्र पाठविल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या धमकीच्या पत्रानंतर पोलिसांनी राजभवनाची सुरक्षा वाढवली आहे.

  • Share this:

लखनऊ 03 डिसेंबर : उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना माओवाद्यांनी धमकी दिलीय. राजभवनाला माओवाद्यांच्या धमकीचं पत्र मिळालं असून त्यामुळे राज्यात खळबळ उडालीय. 10 दिवसांमध्ये राजभवन सोडून जा अन्यथा डायनामाईटच्या साह्याने सर्व इमारत उडवून देऊ असं त्या धमकीच्या पत्रात म्हटलं आहे. राज्याच्या गृहविभागाने या पत्राची गंभीर दखल घेतली असून गृहविभागाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

झारखंडच्या माओवादी संघटनेने हे पत्र पाठविल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या धमकीच्या पत्रानंतर पोलिसांनी राजभवनाची सुरक्षा वाढवली आहे. तर पत्राची चौकशीही सुरू केलीय. हे पत्र कुठून आलं याचीही माहिती काढण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर आजच एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारने मावोवाद्यांचं कंबरडं मोडल्याचं म्हटलं होतं. पंतप्रधानांनी हे मत व्यक्त केल्याच्याच दिवशी असं पत्र मिळाल्याने सुरक्षा संस्थांनी त्याची गंभीर दखल घेतलीय.

राज्यात थंडी वाढणार, पण या भागात पडणार दोन दिवसांमध्ये पाऊस

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी उधळला होता मोठा कट

माओवादी पुन्हा एकदा सुरक्षा दलाला टार्गेट करण्याची शक्यता गुप्तचर सूत्रांनी व्यक्त केलीय. गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा संस्था माओवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन असून सुरक्षा दलांवर हल्ल्याचा एक मोठा कट उघडकीस आलाय. यात माओवादी तीन मोठे स्फोट करण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी IED ब्लास्ट करण्याची योजना तयार केली होती. हा कट नोव्हेंबर महिन्यात उघडकीस आला होता. त्यामुळे सुरक्षा दल सतर्क झालंय. या आधीही सुरक्षा दलांनी माओवाद्यांचे अनेक कट उघडकीस आणले आहेत. हा कट उघडकीस आल्याने सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरुद्धच्या कारवाईचा फेरआढावा घेतला आहे.

वीर सावरकरांना भारतरत्न: केंद्र सरकारने केलं मोठ वक्तव्य!

छत्तीसगडमधल्या बीजापूर इथं हे स्फोट घडविण्याची माओवाद्यांची योजना होती. इथल्या गंगालूर साप्ताहिक बाजारात माओवादी हा स्फोट घडविणार होते. यासाठी त्यांनी तीन IED ब्लास्ट घडवून आणण्याची योजना (IED Bomb Plant) तयार केली होती. हे बॉम्ब सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली असून ते बॉम्ब निष्क्रिय केले आहेत.

आठवडी बाजारात बॉम्ब ब्लास्ट करून दहशत घडवून आणण्याचीही त्यांची योजना होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय. सगळा परिसर पिंजून काढण्यात येत असून सुरक्षा दलं सर्व खबरदारी घेत आहेत. या आधी दंतेवाडा इथं पोलिसांनी एक टिफीन बॉम्ब जप्त केला होता. पोटाली पटेल पारा मार्गावर तब्बल 7 किलोंचा हा बॉम्ब प्लांट करून ठेवला होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 3, 2019, 10:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading