लखनऊ 12 फेब्रुवारी : प्रियांका गांधी यांच्या सोमवारच्या रोडशोदरम्यान प्रचंड गर्दी जमली होती. मात्र या रोडदरम्यान मोबाईल चोरण्याच्या अनेक घटना घडल्याचं स्पष्ट झालं आहे. 50 च्या वर मोबाईल फोनची चोरी तर तेवढेच पाकिटं चोरट्यांनी संपास केल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत.
सक्रिय राजकारणात आल्यानंतर प्रियांका आणि राहुल गांधी यांनी लखनऊ विमानतळ ते काँग्रेसचं ऑफिस असा रोड शो केला होता. 15 किलोमीटरचं अंतर पार करायला त्यांना तब्बल 5 तास लागले होते. या पाच तासात लोकांनी फोटो, व्हिडीओ आणि सेल्फी काढण्यासाठी आपल्या हातात मोबाईल धरले होते. ते मोबाईल चोरट्यांनी शिताफीने लंपास केले आहेत.
प्रियंका यांची युपीच्या राजकारणातील एंट्री काँग्रेससाठी किती फायद्याची ठरणार, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रियंका यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाचा काहीही परिणाम होणार नाही असं भाजपने म्हटलं आहे. पण भाजपचे अनेक नेते प्रियंका यांच्यावर टीका करत आहेत. प्रियंका यांच्या एंट्रीनंतर भाजप घाबरली आहे आणि त्यातूनच प्रियंका यांच्यावर वैयक्तिक टीका केली जात आहे, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आता प्रियंका गांधी युपीत दाखल झाल्यानंतर भाजपही अलर्ट झाली असणार आहे.
कारण उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि मायावती यांनी आघाडी केल्याने भाजपला मोठा फटका बसणार आहे, अशी शक्यता अनेक सर्वेतून समोर येत आहे. अशातच आता प्रियंकाच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशामुळे भाजपला युपीतील जागा राखण्यासाठी आणखीच मोठी कसरत करावी लागेल.
सलाम भारतीय जवानांना! हा VIDEO पाहून तुमचा ऊर अभिमानाने भरुन येईल