Home /News /national /

सपा-बसपा आघाडीचे भविष्य अंधारात; मायावती स्वबळावर लढणार!

सपा-बसपा आघाडीचे भविष्य अंधारात; मायावती स्वबळावर लढणार!

लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत आघाडी करून देखील मनासारखे निकाल न लागल्याने बसपाच्या प्रमुख मायावती नाराज आहेत.

    लखनऊ, 03 जून: लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत आघाडी करून देखील मनासारखे निकाल न लागल्याने बसपाच्या प्रमुख मायावती नाराज आहेत. त्यामुळेच उत्तर प्रदेशात 11 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत बसपा पुन्हा स्वबळावर लढणार असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील सेंट्रल ऑफिसमध्ये सोमवारी मायावती यांनी निकालासंदर्भात आढावा बैठक घेतली होती. सपा सोबत आघाडी केल्याचा काहीही फायदा झाला नसल्याचे मायावती यांनी बैठकीत स्पष्ट केले. निवडणुकीत यादवांची मते बसपाला मिळाली नाहीत असेही त्या म्हणाल्या. निकालानंतर बसपाच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या फिडबॅकनंतर मायावती यांनी बैठकीत सांगितले की, आघाडी केल्यानंतरही बसपाला मतदान मिळाले नाही. त्यामुळेच आगामी पोटनिवडणुकीत बसपा स्वबळावर लढणार आहे. लोकसभा निवडणुकीत बसपाला 11 जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर आता रिक्त झालेल्या जागांवर पुढील 6 महिन्यात निवडणुका होणार आहेत. 2019च्या लोकसभेत बसपाला समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत. तर अन्य राज्यांमध्ये पक्षाला काहीच यश मिळाले नाही. निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी मायावती यांनी राष्ट्रीय स्तरावरची बैठक बोलवली होती. उत्तर प्रदेशातील बसपाचे खासदार आमि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत मायावतींनी पक्ष सर्व विधानसभेच्या पोटनिवडणुका स्वबळावर लढणार आहे. यापुढे 50 टक्के मत मिळवण्याचा लक्ष्य ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोटनिवडणूक स्वबळावर न लढणारा पक्ष राजकीय तज्ज्ञांच्या मते पोटनिवडणूक स्वबळावर लढण्याचा बसपाचा निर्णय धक्कादायक आहे. बसपाचा इतिहास पाहिल्यास पक्ष पोटनिवडणुकीत कधीच उमेदवार उभे करत नाही. 2018च्या लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत पक्षाने उमेदवार उभे केले नव्हते तर सपाला पाठिंबा दिला होता. याच आधावार लोकसभा निवडणुकीत सपा-बसपा एकत्र आले होते. जर आता मायावतींनी पोटनिवडणूक स्वबळावर लढवली तर भविष्यात सपा सोबतच्या आघाडीवर शंका उपस्थित केली जाऊ शकते. 38 पैकी मिळाल्या 10 जागा उत्तर प्रदेशात सपा सोबत आघाडी केल्यानंतर बसपाने 38 जागांवर निवडणुक लढवली होती. त्यापैकी 10 जागांवर त्यांना विजय मिळवता आला. तर 37 जागांवर लढणाऱ्या सपाला केवळ 5 जागांवरच यश मिळाले. EVMवर टीका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर.एस.कुशवाहा यांनी निवडणुकीतील अपयशाचे खापर EVMवर फोडले. EVMमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळेच निकाल अपेक्षेप्रमाणे लागले नाहीत. आज झालेल्या बैठकीत ईव्हीएम संदर्भात चर्चा आली. VIDEO : गोपीनाथ मुंडेंचं नाव लावण्यावरून मुख्यमंत्री कुणाला म्हणाले करंटे?
    First published:

    Tags: Bsp, Lok sabha election 2019, Lucknow news, Mayawati

    पुढील बातम्या