सुप्रीम कोर्टाचा मायवतींना आणखी एक झटका, फेटाळली याचिका

सुप्रीम कोर्टाचा मायवतींना आणखी एक झटका, फेटाळली याचिका

प्रचारादरम्यान भडकाऊ भाषणं केल्यामुळे निवडणूक आयोगानं मायावती यांच्यावर प्रचारावर बंदी घातली होती.

  • Share this:

उत्तर प्रदेश, 16 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होण्याआधी बसपा प्रमुख मायावती यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मायावती यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे सध्यातरी मायावती यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. आचारसंहिंतेचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली. यात त्यांच्यावर 48 तासांची प्रचारबंदी करण्यात आली होती.

या कारवाईवरून दिलासा मिळावा यासाठी मायावती यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. ती कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. मतदानाला अवघे 2 दिवस उरले असल्यामुळे प्रचार सभा काढण्यासाठी मायावती यांनी कोर्टात परवानगी मागितली होती.

प्रचारादरम्यान भडकाऊ भाषणं केल्यामुळे निवडणूक आयोगानं मायावती यांच्यावर प्रचारावर बंदी घातली होती. 16 एप्रिलपासून ही प्रचारबंदी लागून होणार आहे. मायावती यांच्यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निवडणूक आयोगाकडून प्रचारबंदी घातली होती. खरंतर योगी आदित्यनाथ हे भाजपचे तर, मायावती या बसपा - सपा आघाडीच्या स्टार प्रचारक आहेत.

हेही वाचा: अडसुळांनी शिवसेना संपवली, लोकांचे जीवही घेतले; नवनीत राणांचा हल्लाबोल

काय म्हणाल्या होत्या मायावती

बसपाच्या नेत्या मायावतींनी उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूर आणि बरेली जिल्ह्यात मुस्लीम मतदारांना आवाहन केलं होतं. मतांचं विभाजन होण्यापासून सावध राहा, असा इशाराच त्यांनी दिला होता. यानंतर, आपण हे वक्तव्य बहुजन समाजाला उद्देशून केलं, मुस्लिमांना नाही, अशी सारवासारव मायावतींनी केली.

दरम्यान, या दोन्ही नेत्यांनी केलेली विधान त्यांना भोवली असून त्यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करत प्रचारबंदी केली आहे. लोकसभा निवडणुकीत नेते पातळी सोडून प्रचार करताना दिसत आहेत. त्यावरू आता निवडणूक आयोगानं कठोर करवाईला सुरूवात केली आहे. त्याचा पहिला दणका हा योगी आदित्यनाथ आणि मायावती यांना बसला आहे.

काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ यांनी भारतीय सेनेचा उल्लेख 'मोदी की सेना' असा केला होता. या वक्तव्याची दखल घेत निवडणूक आयोगाने घेत योगी आदित्यनाथ यांना नोटीस देखील पाठवली होती. त्यानंतर आता त्यांच्या प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे.

VIDEO : ...आणि भाजपच्या जाहिरातीतल्या 'पोस्टर बाॅय'ला राज ठाकरेंनी व्यासपीठावरच बोलावलं!

First published: April 16, 2019, 11:32 AM IST

ताज्या बातम्या