गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविरुद्ध लढणार बॉलिवूड अभिनेत्रीची आई

गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविरुद्ध लढणार बॉलिवूड अभिनेत्रीची आई

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक हायप्रोफाईल आहे. या मतदारसंघातून बॉलिवूड अभिनेत्रीची आई निवडणूक लढवणार आहे.

  • Share this:

लखनऊ, 16 एप्रिल: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक हायप्रोफाईल आहे. देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांना शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा टक्कर देणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पूनम सिन्हा यांच्या उमेदवारीवरून चर्चा सुरू होती. आता समाजवादी पक्षाने मंगळवारी त्यांना पक्षाची प्राथमिक सदस्यता दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूनम सिन्हा 17 एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहेत.

लखनऊ मतदारसंघातून राजनाथ सिंह यांच्याविरुद्ध लढण्यासाठी सपा एका चेहऱ्याच्या शोधात होते. सपाला असा उमेदवार हवा होता जो राजनाथ यांना टक्कर देईल. काही दिवासांपूर्वीच शत्रुघ्न सिन्हा यांनी सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. या भेटीतच पूनम सिन्हा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. पण प्रथम शत्रुघ्न सिन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करावा आणि त्यानंतरच लखनऊमधील उमेदवाराची घोषणा केली जावी, अशी सपाची इच्छा होती.

विशेष म्हणजे काँग्रेसकडून राजनाथ सिंह यांच्याविरुद्ध कोणी लढण्यास तयार दिसत नाही. या मतदारसंघातून काँग्रेस एका ब्राह्मण चेहरा देण्याचा विचार करत होती. यासाठी त्यांनी जितिन प्रसाद यांना देखील ऑफर दिली होती. पण प्रसाद यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यानंतर काँग्रेसने प्रमोद कृष्णम आणि हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणि महाराज यांना देखील ऑफर दिली. पण या दोघांनी नकार दिल्याचे समजते.

आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी लखनऊ मधून कोणताही उमेदवार न देण्याचे ठरवले आहे. ज्यामुळे मत विभाजन होणार नाही. पूनम सिन्हा यांना उमेदवारी देण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे या मतदारसंघात दीड लाख मतदार हे कायस्थ आहेत. त्याच बरोबर शत्रुघ्न यांचा स्टारडम देखील उपयोगी पडू शकतो. पूनम सिन्हा या सिंधी कुटुंबातील असून या मतदारसंघात त्यांची संख्या देखील मोठी आहे.

कसा आहे लखनऊ मतदारसंघ

गेल्या दोन दशकापासून लखनऊ मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातोय. या मतदारसंघातून भाजपचा पराभव करण्यासाठी सपा आणि काँग्रेस नेहमीच प्रयत्न करत असते. पण अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना कधीच यश मिळवून दिले नाही. 2007मध्ये वाजपेयींनी राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर 2009मध्ये लालजी टंडन यांनी येथून विजय मिळवला होता. त्यानंतर 2014मध्ये राजनाथ सिंह यांनी मोठा विजय मिळवला होता.

First published: April 16, 2019, 3:45 PM IST

ताज्या बातम्या