सुकामेवा विकणाऱ्या काश्मीरी तरुणांना दांडक्याने मारहाण

ड्राय फ्रुट विकणाऱ्या तरुणांना भगवी कपडे घातलेल्या तीन चार तरुणांकडून मारहाण

News18 Lokmat | Updated On: Mar 7, 2019 12:05 PM IST

सुकामेवा विकणाऱ्या काश्मीरी तरुणांना दांडक्याने मारहाण

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील ड़ालीगंज पुलावर सुका मेवा विकणाऱ्या दोन काश्मीरी युवकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. कुलगाममधील युवक सुकामेवा विकत असतामा त्यांना भगवी कपडे घातलेल्या लोकांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.

भगवी कपडे घातलेल्या लोकांना स्थानिकांनी विरोध केल्यानंतर तिथून काढता पाय घ्यावा लागला. काही लोकांनी याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर ही घटना समोर आली आहे.

मारहाण करणाऱ्या युवकांनी काश्मीरी युवकांना मारहाण करताना हे काश्मीरी आहेत. आपल्या सैन्यावर दगडफेक करतात असे म्हणत मारहाण केली. तरुणांच्या मारहाणीतून वाचण्यासाठी काश्मीरी तरुणांनी पळ काढला.

Loading...

डालीगंज पुलावर सुकामेवा विकणाऱ्या तरुणांना मारहाणीची घटना समोर आल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान पीडित तरुणांनी तक्रार दाखल केली असून या प्रकरणी लखनऊ पोलीस अधिक तपास करत आहेत.

लखनऊ पोलीसांनी ट्वीट करताना म्हटले आहे की, या प्रकरणाची माहिती हसनगंज येथून मिळाली आहे. या प्रकरणी तपास करून योग्य ती कारवाई केली जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर युवक सुका मेवा विकत असताना काही तरुणांनी तुम्ही इथे कसे काय विक्री करत आहात? असे विचारले.

त्यानंतर काही बोलायच्या आतच त्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरूवात करण्यात आली. ही घटना बुधवारी घडली.

याआधीही उत्तर प्रदेशात अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. एका हस्तशिल्प प्रदर्शाना काश्मीरी युवकांचा स्टॉल बंद पाडण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2019 12:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...