'सवर्ण आरक्षण' भाजपसाठी ठरणार गेम चेंजर, उत्तर प्रदेशात 40 जागांवर फायदा

'सवर्ण आरक्षण' भाजपसाठी ठरणार गेम चेंजर, उत्तर प्रदेशात 40 जागांवर फायदा

उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्येही या निर्णयाचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

लखनऊ 9 जानेवारी : लोकसभा निवडणुकीला चार महिने राहिले असताना सवर्णांना आरक्षण देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मोठी खेळी खेळली आहे. या निर्णयामुळे भाजप विरोधातली धार थोडी कमी होण्याची शक्यता असून या निर्णयाला सर्वात जास्त फायदा उत्तर प्रदेशात मिळण्याची शक्यता आहे.

तीन राज्यांच्या विधानसभेतला पराभव, राफेलचा मुद्दा यामुळे लोकांमध्ये नाराजी होती. ही नाराजी कशी दुर करायची याची भाजपला काळजी वाटत होती. त्यातच सुप्रीम कोर्टाने SC/ST कायद्यात सुधारणांचा आदेश दिला होता त्यामुळे त्या वर्गामध्ये नाराजीची भावना होती. सरकारने तो कायदा शिथिल न केल्यामुळे सवर्णांमध्ये नाराजी होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे विरोधी पक्षांचीही कोंडी झालीय. त्यांना पूर्ण विरोधही करता येत नाही आणि समर्थनही करत येत नाही. त्यामुळे त्याचा फटका त्यांना बसणार आहे. भाजपसाठी सवर्ण मतदार अतिशय महत्त्वाचे असून भाजपला मिळालेल्या मतांमध्ये 50 टक्के वाटा हा सवर्ण मतदारांचा असतो.

उत्तर प्रदेशतल्या 80 लोकसभा जागांपैकी भाजपने 2014 मध्ये तब्बल 71 जागा जिंकल्या होत्या. यातल्या 40 जागांवर सवर्ण मतदारांचा प्रभाव आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयामध्ये सवर्ण मतदारांचा मोठा वाटा आहे. 1980 नंतर सध्या भाजपमध्ये सर्वात जास्त सवर्ण आमदार आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभेत सवर्ण आमदारांचं प्रमाण 44.3 टक्के असून 2012 मध्ये ते प्रमाण 12 टक्के होतं. उत्तर प्रदेशात एकूण मतदारसंघात उच्च वर्णीय जातींचं प्रमाण 25 ते 28 टक्के आहे. यात सर्वात जास्त ब्राम्हण मतदारांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्येही या निर्णयाचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.

VIDEO : सवर्ण आरक्षण विधेयक, काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया!

First Published: Jan 9, 2019 05:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading