‘तिने’ घेतला ‘थप्पड’चा बदला! हिंदुत्त्ववादी नेत्याच्या हत्येची Inside Story

‘तिने’ घेतला ‘थप्पड’चा बदला! हिंदुत्त्ववादी नेत्याच्या हत्येची Inside Story

रिल लाईफ थप्पडची चर्चा सुरु असतानाच रियल लाईफ थप्पडची एक धक्कादायक कहाणी समोर आलीय.

  • Share this:

लखनौ,06 फेब्रुवारी: आगामी बहुचर्चित ‘थप्पड’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला. रील लाईफ थप्पडची चर्चा सुरु असतानाच रियल लाईफ थप्पडची एक धक्कादायक कहाणी समोर आलीय. हिंदुत्त्ववादी नेता रणजीत बच्चनच्या हत्याकांडानं लखनौसह देशभर एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना जी माहिती मिळाली ती हादरवून टाकणारी आहे. रणजीत बच्चन यांची हत्या अनैतिक संबंधातून झाली असून त्यामागे एक 'थप्पड' असल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून एक आरोपी अजूनही फरार आहे. हिंदुत्ववादी नेता रणजीतची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी केली नसून त्यांच्या दुसऱ्या पत्नीनंच प्रेमात अडथळा ठरणाऱ्या रणजीतचा प्रियकराच्या मदतीनं काटा काढला. या हत्याकांडात स्मृतीचाही थेट सहभाग असल्याचं समोर आलंय.

'तिने' घेतला ‘थप्पड’चा बदला!

रणजीत यांची पत्नी स्मृतीचे दिपेंद्रसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती रणजीत यांना कळाली. त्यावर संतप्त होवून रणजीत यांनी स्मृतीला थप्पड लगावली. त्या थप्पडचा राग तिच्या मनात होता. तिला आणि दिपेंद्रला रणजीतपासून सुटका हवी होती. त्या दोघांना एकत्र राहायचं होतं. त्यामुळे दोघांनी मिळून रणजीतच्या हत्येचा कट रचला. दिपेंद्र विकासनगरच्या एका हॉटेलमध्ये थांबला होता. 29 आणि 30 जानेवारीला त्यानं रणजीतची रेकी केली. 1 फेब्रुवारीच्या रात्री रायबरेलीवरून चालत तो लखनौला पोहोचला. हत्याकांडात वापरलेली पांढरी बलेनो कार पोलिसांनी ताब्यात घेतलीय.

पोलिसांच्या हाती ठोस पुरावे

हत्याकांडासंदर्भातले सगळे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत. खुनी हत्या केल्यानंतर रायबरेलीला पळून गेले. एवढंच नाही तर दिपेंद्रनं हत्येच्या दिवशी दोन फोन आणि सिमकार्ड वापरले. पोलिसांनी तेही जप्त केलेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही हत्या केवळ घृणेतून झालीय. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

First published: February 6, 2020, 6:37 PM IST

ताज्या बातम्या