सामूहिक हत्याकांडाने खळबळ! कुटुंबातील 6 जणांची केली हत्या आणि पोलिसांसमोर गेला तरुण

सामूहिक हत्याकांडाने खळबळ! कुटुंबातील 6 जणांची केली हत्या आणि पोलिसांसमोर गेला तरुण

तरुणाने धारधार शस्त्राचे वार करत आई- वडिल, भावासह त्याची बायको आणि दोन मुलं यांचा खून केला.

  • Share this:

लखनऊ, 30 एप्रिल : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये लॉकडाऊनमध्ये एका माथेफिरू तरुणाने त्याच्या घरातील सहा जणांची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. आरोपीने दोन लहान मुलांनाही निर्दयीपणे ठार केलं. त्यांचे गळे कापून हत्या केली असून या हत्याकांडामुळे लखनऊ हादरलं आहे. सामूहिक हत्याकाडं बंथरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोदौली गावात झालं आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोदौली गावातील अजय नावाच्या तरुणाने धारधार शस्त्राचे वार करत आई- वडिल, भावासह त्याची बायको आणि दोन मुलं यांना ठार केलं. तरुण माथेफिरू असल्याचं सांगितलं जात आहे. सहा जणांची हत्या केल्यानंतर आरोपी तरुण स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आणि आत्मसमर्पण केलं.

पोलिसांसमोर तरुणाने हत्याकांडाची माहिती देताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी अजयला सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीला अटक करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

हे वाचा : लॉकडाऊनमध्ये वडिलांना उपचारासाठी सायकल रिक्षावरून घेऊन निघाली पण...

प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली की, आरोपीच्या घरात संपत्तीचा वाद होता. यातच अजयला घरच्यांनी काही संपत्ती त्याच्या अपरोक्ष विकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर चिडलेल्या अजयने सहा जणांची हत्या केली. सध्या आरोपीची चौकशी सुरू असून घटनेनंतर गावातील लोक भीतीच्या छायेखाली आहेत.

हे वाचा : आयुष्यभर साथ दिलेल्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू, वृद्ध पतीने घेतला 'हा' निर्णय

First published: April 30, 2020, 11:41 PM IST

ताज्या बातम्या