हवेत गोळीबार करत तलवारीनं कापला केक, तरुणाचा थरारक VIDEO VIRAL

गाडीच्या बोनेटवर केक ठेवून तलवारीनं कापल्याचा आणि गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गाडीच्या बोनेटवर केक ठेवून तलवारीनं कापल्याचा आणि गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:
    लखनऊ, 19 नोव्हेंबर : वाढदिवसाचा आनंद लुटण्यासाठी तरुणानं चक्क हवेत एक दोन राऊंड नाही तर अनेक वेळा हवेत गोळीबार केला आहे. इकच नाही तर कारच्या बोनेटवर तलवारीनं केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तरुणानं हवेत गोळीबार केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता पिस्टर रिकामी होईपर्यंत तरुण हवेत गोळीबार करतो आणि त्यानंतर दुसरा तरुण तलवारीनं गाडीच्या बोनेटवर ठेवण्यात आलेला केक कापून वाढदिवस साजरा केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा-सुशांत प्रकरणात फेक न्यूजचा सुळसुळाट! युट्यूबरने कमावले लाखो, FIR दाखल वाढदिवस साजरा करण्यासाठी तरुणानं हवेत गोळीबार केला आहे. बोनेटवर तलवारीनं केक कापल्याचा आणि गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ परिसरातील आहे. या घटनेचा व्हिडीओ 20 दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती मिळाली आहे. तर या प्रकरणी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली असून एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. व्हिडीओच्या मदतीनं पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: