देशाच्या गृहमंत्र्यांना आहे हा छंद, वाचून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य!

देशाच्या गृहमंत्र्यांना आहे हा छंद, वाचून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य!

देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लखनऊ मतदारसंघातून अर्ज दाखल केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 एप्रिल: लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना प्रत्येक उमेदवाराला त्यांची संपत्ती, उत्पन्न आणि अन्य माहिती आयोगाला सादर करावी लागते. देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लखनऊ मतदारसंघातून अर्ज दाखल केला. अर्जासोबत त्यांनी प्रतिज्ञापत्र देखील दाखल केले. प्रतिज्ञापत्रनुसार राजनाथ सिंह यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात दुप्पट झाली आहे. पण प्रतिज्ञापत्रातील सर्वात नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे त्यांना शस्त्र बाळगण्याचा छंद आहे.

आयोगाला दिलेल्या माहितीनुसार राजनाथ यांच्याकडे एक रिव्हॉल्वर आहे. तर एक बंदूक देखील आहे. ही बंदूक त्यांना वारसाहक्काने मिळाली आहे. तर रिव्हॉल्व्हर त्यांनी सुरक्षेच्या कारणासाठी खरेदी केली आहे. लखनऊ मतदारसंघातून राजनाथ यांच्या विरुद्ध सपा-बसपा आघाडीने शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे.

इतकी आहे संपत्ती

राजनाथ सिंह यांच्याकडे 1.64 कोटींची स्थिर संपत्ती आहे तर 2.97 कोटींची अस्थिर संपत्ती आहे. त्यांच्या पत्नीकडे 53 लाख रुपयांची संपत्ती आहे. अशा प्रकारे त्यांची एकूण संपत्ती 5 कोटी 14 लाख 92 हजार 709 रुपये इतकी आहे. राजनाथ यांच्याकडे 68 हजार रुपये रोख रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 37 हजार रुपये रोख आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांवर एक ही गुन्हा नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच त्यांच्यावर कोणतेही कर्ज देखील नाही. 2014मध्ये राजनाथ यांची संपत्ती 2 कोटी 92 लाख 40 हजार 729 इतकी होती.

घर 40 लाखांनी स्वस्त झाले

राजनाथ सिंह यांचे लखनऊ येथे 5 बँक खाते आहेत. या खात्यांमध्ये 91 लाख 38 हजार 667 रुपये आहेत. तर दोन बँकामध्ये त्यांनी FD ठेवल्या आहेत. त्यात 67.4 लाख रुपये आहेत. राजनाथ यांच्याकडे 1.47 कोटींची वारसाहक्काने मिळालेली संपत्ती आहे. लखनऊमधील गोमतीनगर येथे त्यांचे घर असून त्याची किमत 1 कोटी 50 लाख इतकी सांगण्यात आली आहे. 2014मध्ये या घराची किमत 1 कोटी 90 लाख इतकी होती. राजनाथ यांच्या पत्नींकडे 35 लाख 50 हजार रुपयांचे दागिने आहेत.VIDEO : '3 नार्को टेस्ट झाल्या, 24 दिवस काही न खाता राहिले पण...' साध्वी प्रज्ञा झाल्या भावुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 07:56 PM IST

ताज्या बातम्या