S M L

प्रियांका गांधी 29 एप्रिल रोजी वाराणसीतून अर्ज दाखल करणार?

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी 29 एप्रिल रोजी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

Updated On: Apr 24, 2019 08:55 PM IST

प्रियांका गांधी 29 एप्रिल रोजी वाराणसीतून अर्ज दाखल करणार?

नवी दिल्ली, 24 एप्रिल: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी 29 एप्रिल रोजी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच वायनाड येथे पत्रकारांशी बोलताना प्रियांका यांनी वाराणसीमधून निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते. जर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले तर नक्कीच वाराणसीतून निवडणूक लढवू असे त्या म्हणाल्या होत्या.

प्रियांका गांधी वाराणसीतून मोदींना टक्कर देऊ शकतील का? 

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरुद्ध वाराणसी मतदारसंघातून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. यासंदर्भात खुद्द प्रियांका यांनी देखील अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले तर मोदींच्या विरुद्ध निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे. कालच वायनाड येथे राहुल गांधींच्या प्रचारासाठी आलेल्या प्रियांका यांनी वाराणसीमधून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे म्हटले होते.


जर प्रियांका गांधी यांनी मोदींच्या विरुद्ध खरोखरच निवडणूक लढवली तर ती भारतीय निवडणुकीच्या इतिहासातील सर्वात मोठी लढत ठरेल. एका बाजूला देशाचे पंतप्रधान आणि दुसऱ्या बाजूला गांधी कुटुंबातील एक सदस्य अशी ती लढत होईल. प्रियांका यांनी जर वाराणसीतून निवडणूक लढवली तर काँग्रेसला त्याचा फायदा होईल असे मानणारा मोठा वर्ग आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्वांचलमधील जागांचा विचार करुनच मोदींनी वाराणसीतून उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हा मोदी आणि भाजपची लाट होती. पण यावेळीची परिस्थिती वेगळी आहे. प्रियांका यांना वाराणसीमधून मोदींना टक्कर देणे हे तितक सोप आहे का? कसा आहे वाराणसी लोकसभा मतदारसंघ हे जाणून घेणे देखील तितकच महत्त्वाचे आहे.

असे आहे वाराणसीमधील जातीय समीकरण

वाराणसीमध्ये व्यापारी वर्गातील मतदार सर्वाधिक आहे. त्यांची संख्या 3.25 लाख इतकी आहे. त्यानंतर साडेतीन लाख मुस्लिम, अडीच लाख ब्राह्मण, दोन लाख पटेल, दीड लाख यादव, सव्वा लाख भूमीधारक, एक लाख रजपूत, 80 हजार चौरसिया, 80 हजार दलित आणि 70 हजार अन्य जातीचे मतदार आहेत. यातील व्यापारी आणि ब्राह्मण हे दोन भाजपचे पारंपारिक मतदार मानले जातात. मात्र नोटाबंदी आणि जीएसटीमुळे नाराज झालेला वर्ग काँग्रेसकडे वळू शकतो. या वर्गातील मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे काम काँग्रेसला करावे लागले. तर एससी/एसटी कायद्यामुळे ब्राम्हण समाज नाराज आहे. विश्वनाथ कॅरिडॉरच्या निर्मितीसाठी ब्राम्हण समाजाची घरे सर्वाधिक पाडण्यात आली आहेत. या दोन्हीमुळे हा वर्ग नाराज आहे. त्यामुळे तो काही प्रमाणात काँग्रेसकडे वळू शकतो.

Loading...

याशिवाय मुस्लिम मते देखील महत्त्वाची ठरतात. ज्या उमेदवारामध्ये भाजपला हरवण्याची क्षमता आहे अशा पक्षालाच मुस्लिम मते मिळतात असे मानले जाते. या एका फॅक्टरमुळे प्रियांकांची उमेदवारी मजबूत होते. अन्य जातीची मतांचा देखील फायदा प्रियांका यांना होऊ शकतो.

2014ची आकडेवारी काय सांगते

दोन लोकसभा निवडणुकीमध्ये मोठे अंतर असते. 2014मध्ये मोदींची लाट होती. ती लाट यावेळी दिसत नाही. पण गेल्या निवडणुकीत कोणाला किती मते मिळाली ही आकडेवारी देखील महत्त्वाची ठरते. 2014मध्ये मोदींनी 5 लाख 81 हजार 022 मते मिळाली होती. दुसऱ्या नंबरवर असलेल्या अरविंद केजरीवला यांना 2 लाख 09 हजार 238 तर काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना 75 हजार मते मिळाली होती. बीएसपीच्या उमेदवाराला 60 हजार 579 तर सपाला 45 हजार 291 मते मिळाली होती. या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्व विरोधकांना मिळालेल्या मतांपेक्षा मोदींना मिळालेली मते अधिक होती. जर प्रियांका गांधी निवडणू्क लढवणार आहेत म्हणून अन्य कोणत्याच पक्षाने उमेदवार उभा केला नाही तरी आकड्यांच्या खेळात त्या मागेच दिसतात.

अर्थात हे झाले आकड्यांचा खेळ. याशिवाय मोदींनी वाराणसीत केलेल्या विकास कामे देखील मतदारांच्या मनात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रियांका यांना उमेदवारी दिली तर पंतप्रधान मोदींसाठी भाजपला गेल्यावेळी पेक्षा थोडी अधिक ताकद लावावी लागेल.


VIDEO : मुख्यमंत्र्यांवर टीका करताना धनंजय मुंडेंची जीभ घसरली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 08:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close