दुबईत कट, सुरतमध्ये बंदूकीची खरेदी आणि लखनऊत गळा चिरून हत्या!

दुबईत कट, सुरतमध्ये बंदूकीची खरेदी आणि लखनऊत गळा चिरून हत्या!

हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष कमलेश तिवारी यांची शुक्रवारी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकऱणाचा उत्तर प्रदेश पोलिसांनी 24 तासांच्या आत छडा लावला आहे.

  • Share this:

लखनऊ, 19 ऑक्टोबर : हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष कमलेश तिवरी यांच्या हत्येप्रकरणी मोठा उलगडा झाला आहे. कमलेश तिवारी यांची हत्या जरी लखनऊमध्ये गळा कापून झाली असली तरी त्यांच्या हत्येचा कट दुबईत रचण्यात आला होता. गुजरात एटीएसने दावा केला आहे की, कमलेश तिवारी यांच्या हत्येसाठी सुरतमधून बंदूक खरेदी करण्यात आली होती. तर कट रचल्यानंतर एक व्यक्ती दोन महिन्यांपूर्वी दुबईतून भारतात कमलेश तिवारी यांच्या हत्येसाठी भारतात आला होता.

गुजरात एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, कमेलेश तिवारी यांच्या हत्येसाठी दुबईतून आलेल्या दोन लोकांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. सुरतमधून मिठाई खरेदी करणाऱे दोघे शूटर होते. शुक्रवारी कमलेश तिवारी यांची लखनऊमध्ये गळा कापून हत्या करण्यात आली होती. 24 तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावण्यात आला.

शनिवारी सकाळी या प्रकरणी सुरतमध्ये पोलिसांना सहा लोकांना ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेतलेल्यांपैकी एकाची या हत्याकांडात भूमिका असल्याचा संशय आहे. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात सहाजण असून गुजरात पोलिस हे उत्तर प्रदेश पोलिस आणि एसआयटीच्या संपर्कात आहेत.

कमलेश तिवारी यांच्या हत्येनंतर त्यांच्या घरी सूरत घारी मिठाईचा डबा सापडला होता. सुरतची प्रसिद्ध मिठाई असलेल्या डब्यातून आरोपींनी शस्त्रं आणली होती. सुरतमध्ये जिथून मिठाई खरेदी केली होती तिथल्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा चेक करण्यात आले आहेत.

गुजरात एटीएसने दोन वर्षांपुर्वी ऑक्टोबर 2017 मध्ये आयएसआयएसच्या दोन दहशतवाद्यांना पकडलं होतं. या दोन्ही आरोपींना कमलेश तिवारींचा व्हिडिओ दाखवून त्यांची हत्या करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली तेव्हा कमलेश तिवारी यांचे नाव समोर आले होते.

VIDEO : राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना थेट सवाल, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 12:24 PM IST

ताज्या बातम्या