धक्कादायक : हिंदुत्ववादी नेत्याच्या हत्येचं दाऊद कनेक्शन झालं उघड

'प्रमोद' हे नाव एक कोडवर्ड असून ते दाऊदच्या डी कंपनीशी संबंधीत असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 11:18 PM IST

धक्कादायक : हिंदुत्ववादी नेत्याच्या हत्येचं दाऊद कनेक्शन झालं उघड

लखनऊ 31 ऑक्टोंबर : हिंदू समाज पार्टी (Hindu Samaj Party)चे नेते कमलेश तिवारी (Kamlesh Tiwari) यांच्या हत्येचं दाऊद कनेक्शन पुढे आल्याने खळबळ उडालीय. या हत्येच्या घटनेमुळे उत्तर प्रदेशात खळबळ उडाली होती. सुरक्षा संस्थांना एक खास कोडवर्ड मिळाला असून तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) च्या 'डी कंपनी' शी (D Company) संबंधीत आहे. सुरक्षा संस्थांनी जे गुप्त संभाषण पकडलं त्यात या कोडवर्डचा समावेश होता. सुरक्षा संस्था तो कोडवर्ड डी-कोड करण्याचा प्रयत्न करत असून त्यातून धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. केंद्रातल्या काही सुरक्षा संस्थांनी जे गुप्त संभाषण रेकॉर्ड केलं त्यात 'प्रमोद' या नावाचा उल्लेख केला जातोय. 'प्रमोद' हे नाव एक कोडवर्ड असून ते दाऊदच्या डी कंपनीशी संबंधीत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. ही व्यक्ती भारताबाहेर असून मध्य पूर्वेतल्या देशांमध्ये असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्याचं डी-कोडींग करण्यात पोलीस व्यस्त असून लवकरच मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

सत्ता वाटणीसाठी CM आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली, मनोहर जोशींचा गौप्यस्फोट

मुख्य आरोपींना अटक

उत्तर प्रदेशातल्या हिंदू समाज पार्टी नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना 22 ऑक्टोबरला मोठं यश मिळालं होतं. या प्रकरणात पोलिसांना पाहिजे असलेले मुख्य आरोपी अश्फाक आणि मोईउद्दीन पठाण यांना गुजरातATSने अटक केली होती. गुजरात राजस्थान सीमेजवळच्या शामलजी इथं ही अटक करण्यात आली होती. हे दोघही आरोपी गुजरातमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्या आधारे गुजरातATS ने खास पथकं तयार केली होती. त्यांनी माग काढत या दोनही आरोपींना अटक अटक केल्याची माहिती गुजरातATS चे डीआयजी हिमांशू शुक्ला यांनी दिलीय. या अटकेमुळे पोलिसांना मोठं यश मिळालंय. या दोनही आरोपींची माहिती देणाऱ्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठं बक्षीस जाहीर केलं होतं.

चक्क अनिल कपूरला मुख्यमंत्रिपदाची ऑफर, नायकानं दिलं हे उत्तर!

Loading...

या प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शनही समोर आलंय. या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी नागपुरातून एका संशयीत आरोपीला अटक केलीय. या आरोपीला लखनऊ इथं नेण्यात आलंय. असिम असं या आरोपीचं नाव आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत असून महत्त्वाचे धागे दोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केलीय जातेय. या प्रकरणी चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती बाहेर येत असून त्या सर्वांना एका सूत्रात जोडण्याचं काम पोलिस करत आहेत. या प्रकरणी आत्तापर्यंत 200 जणांची चौकशी करण्यात आलीय. काही आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन खास पथकं स्थान केली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2019 11:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...