उत्तरप्रदेश पोटनिवडणुकीत योगींना झटका, दोन्ही ठिकाणी भाजप पिछाडीवर

उत्तरप्रदेश पोटनिवडणुकीत योगींना झटका, दोन्ही ठिकाणी भाजप पिछाडीवर

  • Share this:

उत्तरप्रदेश, 31 मे : कैरना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला असून आरएलडीने आघाडी घेतलीये. आरएलडीचे उमेदवार तबस्सुम हसन 19923 मतांनी पुढे आहे. तर भाजपचे उमेदवार मृगांका सिंह पिछाडीवर आहे. तसंच  उत्तर प्रदेशमधील नूरपुरमध्ये समाजवादी पार्टीचे नईमुल हसन 3450 मतांनी आघाडीवर आहे. सपाचे उमदेवार नईम ऊल हसन यांना 17 फेरीनंतर 64295 मतं मिळालीये. भाजपचे उमेदवार अवनी सिंह यांना 60845 मतं मिळाली आहे.

तर कैरानामध्ये आरएलडीचे उमेदवार तबस्सुम हसन यांना1 लाख 70 हजार 787 मतं मिळाली आहे. तर भाजपचे उमेदवार प्रत्याशी मृगांका सिंह यांना 1 लाख 50 हजार 864 मतं मिळाली आहे.

विशेष म्हणजे, गोरखपूर आणि फुलपूर निवडणुकीत पराभवानंतर भाजपसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची ठरलीये.

Palghar By-election Result 2018: पालघरमध्ये मतदारांनी दाखवला काँग्रेसला 'हात'

कैरना, उत्तर प्रदेश (लोकसभा) उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ८० जागा आहेत. कैरना हा लोकसभा मतदारसंघ पश्चिम उत्तर प्रदेशात येतो. 1962 मध्ये इथं पहिल्यांदा निवडणूक झाली. भाजपचे खासदार हुकूम सिंग यांच्या निधनामुळं इथं पोटनिवडणूक होत आहे. नाकूर, गंनगोह, कैरना, ठाना भवान आणि शामली हे सहा विधानसभा मतदार संघ यात येतात. २००९ मध्ये बहुजन समाज पक्षच्या तबस्सुम बेगम यांनी ही जागा जिंकली होती तर भाजपचे हुकूम सिंग यांनी २०१४ मध्ये बाजी मारली होती.

Bhandara-Gondia By-election Result 2018 : तिसऱ्यात फेरीत डाव बदलला ; राष्ट्रवादी आघाडीवर,भाजपची पिछाडी

नुरपूर, उत्तर प्रदेश (विधानसभा) पश्चिम उत्तर प्रदेशातल्या बिजनौर जिल्ह्यात हा मतदारसंघ येतो. नगिना या लोकसभा मतदार संघाचा हा भाग आहे. भाजपचे आमदार लोकेंद्र सिंग यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यामुळे इथं पोटनिवडणूक होत आहे. २०१२ आणि २०१७ मध्ये सिंग यांनीच हा मतदारसंघ जिंकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2018 11:15 AM IST

ताज्या बातम्या