भाजपचा पराभव करत उत्तर प्रदेशच्या नुरपूरमध्ये समाजवादी पार्टीचा झेंडा

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील नुरपूर विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. समाजवादी पार्टीच्या नईमुल हसन यांनी भाजपच्या अवनि सिंह यांना 6688 मतांनी पराभव केला आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 31, 2018 02:30 PM IST

भाजपचा पराभव करत उत्तर प्रदेशच्या नुरपूरमध्ये समाजवादी पार्टीचा झेंडा

उत्तर प्रदेश, ता. 31 मे : उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील नुरपूर विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. समाजवादी पार्टीच्या नईमुल हसन यांनी भाजपच्या अवनि सिंह यांना 6688 मतांनी पराभव केला आहे.

भाजप आमदार लोकेंद्र सिंह यांच्या निधनानंतर नुरपूर मतदारसंघ रिक्त झाला होता. लोकसभा मतदारसंघातून भाजपने लोकेंद्र सिंहांच्या पत्नी अवनी सिंह यांना उमेदवारी दिली होती. तर सपाकडून ही निवडणुक नईमुल हसन लढत होते.

आतापर्यंत कोणत्या जागांचे निकाल लागले आहेत पाहुयात...

- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना मागे टाकत भाजपच्या राजेंद्र गावित यांचा विजय

- कर्नाटकच्या राजराजेश्वरी नगरमध्ये काँग्रेसच्या मुनिरत्न यांचा 41162 मतांनी विजय.

Loading...

- उत्तर प्रदेशच्या नूरपुर विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीच्या नईमुल हसन यांचा 6211 मतांनी विजय

- बिहारच्या जोकीहाटमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या पार्टीचे आरजेडी यांचा 76002 मतांनी विजय तर जेडीयूच्या पारड्यात 37913 मतं

- मेघालय विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय. काँग्रेसचे उमेदवार मियानी डी शिरा यांनी एनपीपीचे उमेदवार क्लेमेंट जी मोमिन यांना केलं पराभूत

- केरळच्या चेंगान्नुर विधानसभा पोटनिवडणुकीत सीपीआईएम प्रत्याशीचे उमेदवार साजी चेरियन यांचा 20956 मतांनी विजयी

- झारखंडमध्ये सिल्ली विधानसभा पोटनिवडणुकांमधून जेएमएमच्या सीमा देवी यांचा विजय. आजसूच्या सुदेश महतो यांचा पराभव.

- झारखंड मुक्ति मोर्चाच्या उमेदवार बबिता महतो यांचा झारखंडच्या गोमियामध्ये 1344 मतांनी विजय. भाजपच्या माघवलाल सिंह यांचा केला पराभव

- पंजाबच्या शाहकोट विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसच्या प्रत्याशी हरदेव सिंह यांनी मारली बाजी. 38802 मतांनी शिरोमणि अकाली दलच्या नायब सिंह यांचा केला पराभव

- भाजपने उत्तराखंडच्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये आपला झेंडा रोवला आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा हा पहिला विजय आहे.

- पश्चिम बंगालच्या महेशतला विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या दुलाल चंद्र दास यांचा विजय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2018 02:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...