भाजपने ही जागा जिंकल्यास नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार!

भाजपने ही जागा जिंकल्यास नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार!

काय होते दीनदयाळ यांची भविष्यवाणी आणि त्याचा व भाजपचा सत्तेत येण्याचा काय संबंध हे जाणून घेणे कमालीचे उत्सुकतेचे आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मे: प्रत्येक निवडणूक ही स्वतंत्र असते. निवडणुकीतील मुद्दे आणि लोकांच्या मानसिकता वेगळी असते. असे असले तरी काही मतदारसंघात मात्र याला अपवाद असतात. निवडणुकीच्या या रणधुमाळीत नेतेमंडळी काही वक्तव्य करतात आणि कधी कधी योगायोगाने म्हणा ती खरी होतात. जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी 1973मध्ये एक वक्तव्य केले होते. ते खरं होण्यास 1996 साल उजडावे लागले. काय होते दीनदयाळ याचे वक्तव्य आणि त्याचा व भाजपचा सत्तेत येण्याचा काय संबंध हे जाणून घेणे कमालीचे उत्सुकतेचे आहे.

1973च्या निवडणुकीच्या प्रचारात दीनदयाळ यांनी गाझीपूरमध्ये सांगितले होते की, जर भाजपने ही जागा जिंकली तर त्यांचे सरकार दिल्लीत येईल. दीनदयाळ यांच्या म्हणण्यानुसार सत्तेत येण्यासाठी भाजपला गाझीपूर जागा जिंकणे गरजेचे होते. पण ही जागा जिंकण्यासाठी भाजपला तब्बल 23 वर्ष वाट पहावी लागली. इतक नव्हे तर जेव्हा त्यांनी ही जागा जिंकली तेव्हा ते दिल्लीत सत्तेत आले.

पाहा- VIDEO: स्मृती इराणींचा अमेठीत राहुल गांधींवर हल्लाबोल, मराठीतून साधला संवाद

1996साली भाजपने मनोज सिन्हा यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा प्रचार करण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी आले होते.  त्यावेळी वाजपेयी यांनी दीनदयाळ उपाध्याय यांची त्या वक्तव्याची आठवण करून देत मतदारांना भाजपला मत देण्याचे आवाहन केले होते. 96मध्ये मतदारांनी सिन्हा यांना संसदेत पाठवले आणि योगायोग म्हणजे दीनदयाळ यांचे वक्तव्य खरं ठरले. दिल्लीत 96साली भाजपची सत्ता आली. अर्थात ते सरकार केवळ 13 दिवसच टिकले. पण भाजपच्या एका नेत्याने शपथ घेतली होती हे देखील तितकच खर.

1999च्या निवडणुकीत पुन्हा एकदा गाझीपूरमधून भाजपला विजय मिळाला. भाजपचे मनोज सिन्हा यांनी विजय मिळवला. तेव्हा केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार सत्तेत आले. पण त्यानंतर झालेल्या 2004 आणि 2009च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा गाझीपूरमधून पराभव झाला आणि त्यांना सत्तेतून बेदखल व्हावे लागले. 2014च्या मोदी लाटेत गाझीपूरमध्ये मनोज सिन्हा यांनी दणदणीत विजय मिळवला आणि केंद्रात भाजप स्पष्ट बहुमतात सत्तेत आले.

पाहा- VIDEO 'काँग्रेसचं 'ब्रम्हास्त्र' उत्तर प्रदेशात फेल ठरणार'

जागा किती महत्त्वाची...

भाजपचे सध्याचे नेतृत्व देखील दीनदयाळ उपाध्यय यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे आहे. मोदींनी त्यांच्या संसदेतील अनेक भाषणात दीनदयाळ यांचा उल्लेख केला आहे. आता निवडणुकीच्या काळात देखील दीनदयाळ यांनी गाझीपूरमधील विजयाबद्दलचे वक्तव्याला सध्याचे नेतृत्व किती महत्त्व देते याचा अंदाज यावरून येते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमधील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. त्यानंतर ते फक्त गाझीपूरमधील उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी आले होते. यावरून हे स्पष्ट होते की भाजपला कोणत्याही परिस्थितीत गाझीपूरमधून विजय मिळवायचा आहे.

1998चा अपवाद

अर्थात दिनदयाळ यांच्या त्या वक्तव्याला आणि त्यानंतर भाजपच्या गाझीपूरमधील विजय व केंद्रातील सत्तेला अपवाद देखील आहे. 1998च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या ओम प्रकाश सिंह यांनी विजय मिळवला होता. पण तेव्हा दिल्लीत मात्र भाजपचे सरकार आले होते. 1973च्या काळात गाझीपूर हा डाव्यांचा बालेकिल्ला मानला जात होता. 1991च्या निवडणुकीपर्यंत हीच परिस्थिती होती. 91च्या निवडणुकीत माकपच्या विश्वनाथ शास्त्री यांनी विजय मिळवला होता.

VIRAL VIDEO: 3 भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून चिमुकल्याच्या सुटकेचा थरार

First published: May 4, 2019, 3:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading