महाराष्ट्राची सिद्धी पवार घेणार मोदींसोबत चंद्रयान लँडिंगचा अनुभव, 5 मिनिटांत दिली 20 प्रश्नांची उत्तरं!

महाराष्ट्राची सिद्धी पवार घेणार मोदींसोबत चंद्रयान लँडिंगचा अनुभव, 5 मिनिटांत दिली 20 प्रश्नांची उत्तरं!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमधून देशातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी केंद्र सरकार 29 ऑगस्टला युवकांसाठी खास योजना आणणार असल्याची घोषणा केली होती.

  • Share this:

बारामती, 31 ऑगस्ट : बारामती इथल्या विद्याप्रतिष्ठान बालविकास मंदिर शाळेची विद्यार्थिनी सिद्धी विश्वंभर पवार हीने इस्त्रोच्या ऑनलाईन प्रश्नमंजुषेत मोठं यश प्राप्त केलं आहे. त्यामुळे ती आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बसून चांद्रयान 2 मोहिमेच्या लॅंडिंग क्षणाचा अनुभव घेणार आहे. तिच्या या यशामुळे सगळीकडून तिच्यावर कौतुंकाचा वर्षाव होत आहे.  या स्पर्धेमध्ये 60 विद्यार्थ्यांना यश मिळालं आहे त्यात सिद्धीचाही समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमधून देशातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी केंद्र सरकार 29 ऑगस्टला युवकांसाठी खास योजना आणणार असल्याची घोषणा केली होती. क्रीडा दिनानिमित्तानं प्राचिन खेळांना प्रोत्साहन देत त्यांनी आंतराळसंबंधी प्रश्न-उत्तरांच्या स्पर्धेची घोषणा केली होती. चंद्रयान-2, सोशल मीडिया इत्यादी विषयांवर मोदींनी जनतेशी संवाद साधला होता.

अवघ्या 5 मिनिटांत सिद्धी विश्वंभरने दिली प्रश्नांची उत्तरं...

मोदींनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये तब्बल 60 विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे. या यशस्वी होण्यासाठी सिद्धीच्या शाळेतील शिक्षिका जोती जोशी यांनी तिचा विशेष अभ्यास घेतला होता.

इतर बातम्या - मंदिरात निघालेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, ओळखीच्याच लोकांनी केले अत्याचार!

इस्रोने अवकाश कार्यक्रमासंदर्भात देशातील विद्यार्थ्यांची जाणीव जागृती वाढवण्याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली.  यामध्ये अवघ्या पाच मिनिटात वीस प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्याने सिद्धी पवार हिला 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. त्यामुळे सिद्धीला येत्या 7 सप्टेंबर रोजी इस्रो'च्या बंगळूर इथल्या नियंत्रण कक्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत बसून चांद्रयान 2 मोहिमेच्या लॅंडिंग क्षणाचा अनुभव घेता येणार आहे. संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार आणि शाळेचे प्राचार्य, शिक्षकांनी अभिनंदन केलं असून बारामतीत तिचं विविध थरातून कौतुक होत आहे.

इतर बातम्या - मोदींचं नाव घेताच बसला शॉक, पाहा पाकिस्तानच्या 'आयटम' मंत्र्याचा व्हायरल VIDEO

क्षणात होत्याचं नव्हतं झालं, धुळे केमिकल कंपनीतील स्फोटाचा CCTV VIDEO

Published by: Renuka Dhaybar
First published: August 31, 2019, 9:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading