लखनऊ, 30 डिसेंबर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका वेळेवर (UP Election) होतील, त्याचे संकेत मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र (Chief Election Commissioner Sushil Chandra) यांनी दिले आहेत, त्यांनी यूपीचा दौरा केला आहे. आयोगाने (Election commission) सांगितले की, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ((2022 UP Assembly elections) सर्व पक्षांनी वेळेवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. यूपी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आमची भेट घेतली आणि आम्हाला सांगितले की विधानसभा निवडणुका सर्व कोरोना प्रोटोकॉलचे पालन करून वेळेवर व्हाव्यात.
तीन दिवस आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी 5 जानेवारीला येणार असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशात नवीन मतदार आणि महिला मतदारांची संख्या 52 टक्क्यांनी वाढली आहे. सर्व राजकीय पक्ष वेळेवर निवडणुकीच्या बाजूने आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च दरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्यासमवेत निवडणूक आयोगाच्या 13 अधिकार्यांचे पथक यावेळी उपस्थित होते. ज्यात अनूप चंद्र पांडे, उमेश सिन्हा, राजीव कुमार आणि आयोगाचे इतर अधिकारी होते. निवडणूक आयोगाने गेल्या दोन दिवसांत अनेक बैठका घेतल्या. उत्तर प्रदेश सरकारचा कार्यकाळ 14 मे 2022 रोजी संपत आहे. यूपीमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या 403 आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत यूपी दौऱ्याची माहिती दिली आणि सांगितले की पहिल्या दिवशी यूपीच्या सर्व राजकीय पक्षांची बैठक झाली. यात आयोगाने राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची दखल घेतली. आयोगाने उत्तर प्रदेशातील सर्व 75 जिल्ह्यांतील जिल्हा दंडाधिकारी, आयुक्त, उच्च पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली असून त्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यांच्या कायदा व सुव्यवस्थेची माहिती दिली.
यूपीमध्ये 5 जानेवारीपर्यंत मतदार नोंदणीचे काम सुरू असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. अंतिम मतदार यादी 5 जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे. यावेळी उत्तर प्रदेशातील मतदारांची संख्या 15 कोटींहून अधिक आहे. मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरही लोक आपली नावे नोंदवू शकतात, असे आयोगाने म्हटले आहे. यावेळी 52.8 लाख नवीन मतदारांची भर पडली आहे. जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांनी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे, असे त्यात म्हटले आहे.
महात्मा गांधींबद्दल केलेलं 'ते' वक्तव्य भोवलं, कालिचरण महाराजला मध्यप्रदेशात अटक
पुढील वर्षात 5 राज्यात विधानसभा निवडणूक
पुढील वर्षात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांना माहिती दिली. यात कोविड महामारी काळात कशाप्रकारे निवडणुकीचे नियोजन असणार आहे, याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. EC ने सोमवारी कोविड-19 च्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती. ज्यामध्ये ओमिक्रॉनच्या सावटाखालीच मतदानाला सामोरे जावे लागणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व उपाययोजना करण्यात येणार असून निवडणूक राज्यात लसीकरणाला वेग देण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली. निवडणूक आयोगाने सांगितलेल्या महत्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकुया.
Naseeruddin Shah म्हणतात 'मुघलांचे देशासाठी योगदान', अभिनेत्यावर भडकले नेटकरी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election, Election commssion