मायावतींना धक्का, स्मारक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून 7 ठिकाणी छापे

मायावतींना धक्का, स्मारक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून 7 ठिकाणी छापे

2007 आणि 2011 मध्ये लखनऊ आणि नोयडा परिसरात पार्क आणि स्मारक उभारण्यात आले होते.

  • Share this:

31 जानेवारी :बसपाच्या अध्यक्षा मायावती या सत्तेत असताना झालेल्या १४०० कोटींच्या तथाकथित स्मारक घोटाळ्याप्रकरणी लखनऊमध्ये आज सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं सात ठिकाणी छापे मारले आहे. गोमती नगर आणि हजरतगंज भागात ईडीनं धाडी टाकल्या आहेत.

स्मारक घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने  लखनऊसह उत्तर प्रदेशमध्ये सात ठिकाणी छापे मारले आहे. या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय ईडीला असून त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या छाप्यांमुळे बसपाच्या अध्यक्षा मायावती अडचणीत येऊ शकतात.

2007 आणि 2011 मध्ये लखनऊ आणि नोयडा परिसरात पार्क आणि स्मारक उभारण्यात आले होते.  निर्माण विभाग, नोयडा प्राधिकरण आणि बांधकाम विभागाने पार्क आणि स्मारक उभारले होते. या प्रकरणाची लोकायुक्तांकडून चौकशी करण्यात आली होती. त्यात  1410 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला.

या स्मारकांसाठी वापरण्यात आलेले गुलाबी दगड हे मिर्झापूर येथून मागवण्यात आले होते. परंतु, कागदोपत्री ते राजस्थान येथून आणले असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

2014 मध्ये गोमती नगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. नसीमुद्दीन सिद्दीकी आणि बाबू सिंह कुशवाहासह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

=================================

First published: January 31, 2019, 3:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading