शेवच्या क्षणी काळजाच्या तुकड्याला जवळही नाही घेऊ शकला कोरोना योद्धा बाप

शेवच्या क्षणी काळजाच्या तुकड्याला जवळही नाही घेऊ शकला कोरोना योद्धा बाप

'मी खासगी रुग्णालयात मुलाला उपचारासाठी दाखल केलं असतं तर आज त्याचा जीव वाचला असता'.

  • Share this:

लखनऊ, 10 मे : जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग थैमान घालत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोनाग्रस्तांची काळजी घेण्यासाठी आरोग्यसेवा आणि डॉक्टर्स अहोरात्र आपलं काम करत आहेत. घरापासून दूर कित्येक दिवस केवळ आपलं कर्तव्य बजावण्यासाठी त्यांना राहावं लागत आहे. अशातच मन हेलावून टाकणारे घटना लखनऊमधून समोर आली आहे. लखनऊ इथे एका रुग्णालयात काम करणाऱ्या वॉर्ड बॉयच्या मुलाला शेवटचं छातीला कवटाळता आलं नाही. आपल्या चिमुकल्याला आजारी असताना नीट उपचार मिळू शकले नाहीत याची खंत मनात आहे.

मनीष कुमार त्यागी हे रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करतात. त्यांच्या मुलाची अचानक बिघडली आणि त्याला उलट्या होऊ लागल्या. पोटाचा संसर्ग झाल्यानं त्याची प्रकृती बिघडली होती. घरी पत्नी एकटीच होती. तिने आजूबाजूच्यांच्या मदतीनं सरकारी रुग्णालयात मुलाला उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेऊन गेली. मात्र तिथल्या डॉक्टरांनी उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिली. उपचाराअभावी या मुलाचा मृत्यू झाला आहे. मनीष हे कोरोना रुग्णांची सेवा करत असल्यानं त्यांना 14 दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे काहीच करता येता येऊ शकत नाही याची खंत त्यांना होती.

हे वाचा-महाराष्ट्रानं वाढवली मोदी सरकारची चिंता, 'या' 5 शहरांमध्ये परिस्थिती चिंताजनक

रुग्णालय प्रशासनाची परवानगी घेऊन अखेर ते आपल्या मुलाला पाहण्यासाठी रुग्णालयात गेले. पीपीई किट घालून अखेरचं डोळे भरून पाहण्यासाठी हा बाप रुग्णालयात पोहोचला पण तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानं मुलाच्या पार्थिवाचं अत्यंदर्शन लांबूनच घेतलं आणि त्यानंतर क्वारंटाइनसाठी पुन्हा गेला. सध्या मनीष हे आपल्या घरी आहेत. आपल्या पत्नीला काळजाचा तुकडा गमवल्याचा धक्का मोठा बसला आहे. त्यातून सावरण्यासाठी वेळ लागत असल्यानं मनीष यांना ड्युटी जॉईन कऱण्यात अडथळे येत आहेत.

आम्ही सातत्यानं त्यांच्या संपर्कात आहे असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 'मी खासगी रुग्णालयात मुलाला उपचारासाठी दाखल केलं असतं तर आज त्याचा जीव वाचला असता', अशी खंत मनीष यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये आणखी एक भीषण अपघात, ट्रकमधून लपून घरी जाणाऱ्या 5 लोकांचा मृत्यू

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 10, 2020, 10:14 AM IST

ताज्या बातम्या