महिला पोलिसांवर आरोप, पकडला प्रियांका गांधींचा गळा

महिला पोलिसांवर आरोप, पकडला प्रियांका गांधींचा गळा

प्रियांका कारमधून खाली उतरल्या पायी घराकडे जाण्यासाठी निघाल्या. पण यावेळी पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे.

  • Share this:

लखनऊ, 28 डिसेंबर : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) दोन दिवसांच्या लखनऊ दौऱ्यावर आहेत. यावेळी, त्या नागरिकत्व सुधारित कायदा (CAA Protest) हिंसाचार प्रकरणात तुरूंगात असलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि समाजसेवक एसआर दारापुरी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात होत्या, तेव्हा त्यांच्या ताफ्याला स्थानिक पोलिसांनी रोखलं. यानंतर प्रियांका कारमधून खाली उतरल्या पायी घराकडे जाण्यासाठी निघाल्या. पण यावेळी एका महिला पोलिसांनी प्रियांका गांधी यांचा गळा पकडला आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप प्रियांका यांनी केला आहे.

प्रियांका गांधी यांनी पायी चालत काढला मोर्चा

सुमारे 4 ते 5 किलोमीटर चालत प्रियांका गांधी एसआर दारापुरी यांच्या घरी पोहोचल्या. यावेळी प्रियांका गांधींचे समर्थक तिथे जमले होते. प्रियांका गांधी यांच्या हालचालींवर पोलीस प्रशासनाची कडी नजर होती. दारापुरीच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर त्या हिंसाचारामध्ये अटक केलेल्या सदफ जफरच्या घरी गेल्या होत्या. या दरम्यान, लखनऊ पोलिसांनी प्रियांका यांच्यासोबत धक्काबुक्की केली आणि थेट त्यांचा गळा पकडला असा आरोप त्यांनी केला आहे.

लखनऊ पोलिसांवर प्रियांका गांधींचे आरोप

प्रियांका गांधी यांनी त्यांच्या ऑफिसियल फेसबुक पेजवर पोलिसांच्या धक्काबुक्कीविषयी लिहलं आहे. 'यूपी पोलिसांची ही काय कारवाई आहे? आता मला कुठेही जाण्यापासून रोखलं जात आहे. मी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि समाजसेवक एस.आर. दारापुरी यांच्या घरी जात होते. एनआरसी आणि नागरिकत्व कायद्याचा विरोध केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मला जबरदस्तीने थांबवलं आणि लेडी ऑफिसरने माझा गळा पकडला.

उत्तर प्रदेशात पोलिसांच्या दादागिरीला बळी पडलेल्या प्रत्येक नागरिकाबरोबर मी उभी आहे. तो माझा सत्याग्रह आहे. भाजप सरकार भ्याडपणा दाखवत आहे. मी उत्तर प्रदेशची प्रभारी आहे आणि मी उत्तर प्रदेशात कुठे जाईन याचा निर्णय भाजपा सरकार घेणार नाही.'

Published by: Renuka Dhaybar
First published: December 28, 2019, 8:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading