भगवान रामाच्या नावाने दिवे लावा, लवकरच काम सुरू होईल-योगी आदित्यनाथ

योगी सरकारने अयोध्येमध्ये शरयू नदीच्या किनाऱ्यावर भगवन रामाची भव्य मूर्ती उभारण्याची योजना आखली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2018 05:25 PM IST

भगवान रामाच्या नावाने दिवे लावा, लवकरच काम सुरू होईल-योगी आदित्यनाथउत्तर प्रदेश,04 नोव्हेंबर : भगवान राम यांच्या नावाने एक एक दिवा लावा, त्यामुळे रामाची भव्य मूर्ती उभारण्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल असं आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.


योगी आदित्यनाथ शनिवारी राजस्थान येथील बिकानेरमध्ये एका कार्यक्रमात होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. यंदाच्या दिवाळीत अयोध्येत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरातील रामभक्तांनी भगवान रामाच्या नावाने एक-एक दिवा लावावा असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

Loading...


योगी सरकारने अयोध्येमध्ये शरयू नदीच्या किनाऱ्यावर भगवन रामाची भव्य मूर्ती उभारण्याची योजना आखली आहे. अशी माहिती मिळतेय की, योगी आदित्यनाथ हे दिवाळीच्या मुहूर्तावर या योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे.

रामाची ही मूर्ती जगातील सर्वात उंच मूर्ती असणार आहे. ही मूर्ती १५१ मिटर उंचीची असणार आहे. या मूर्तीची निर्मिती करण्यासाठी २५०० कोटींचा खर्च येणार आहे. यूपी पर्यटन विभागाने रामाच्या या मूर्तीची प्रतिकृती तयार केली आहे.


रामाच्या या भव्य मूर्तीमुळे अयोध्येत दिवाळीचा उत्साहाला उधाण आले आहे. अयोध्येच्या घाटावर ३ लाखांहुन अधिक दिवे लावून जागतिक विक्रम केला जाणार आहे.


रामाच्या भव्य मूर्ती उभारण्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र नाथ पांडेय यांनी म्हटलं की, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येला घेऊन जी योजना आखली आहे ती भगवान राम यांची जन्मभूमी आहे. दिवाळी येऊ द्या नक्कीच चांगली बातमी मिळेल."


=====================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2018 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...