'हनुमान तर मुस्लीम', योगींनंतर 'या' भाजप नेत्याचं वक्तव्य

'हनुमान तर मुस्लीम', योगींनंतर 'या' भाजप नेत्याचं वक्तव्य

मुस्लिमांमध्ये रहमान, सुल्तान, इमरान, जीशान, रेहान अशी नाव आहे तसंच हनुमान यांचं नाव सुद्धा मुस्लीम आहे

  • Share this:

अजेयंद्र राजन, प्रतिनिधी

20 डिसेंबर : भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे सदस्य बुक्कल नवाब यांनी भगवान हनुमान यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. बुक्कल यांनी हनुमान हा मुस्लीम असल्याचं सांगितलं आहे. मुस्लिमांमध्ये रहमान, सुल्तान, इमरान, जीशान, रेहान अशी नाव आहे तसंच हनुमान यांचं नाव सुद्धा मुस्लीम आहे. हिंदूमध्ये तुम्हाला अशी नावं मिळणार नाही फक्त हनुमान नाव मिळेल. त्यामुळे हनुमान हे मुस्लीम होते असा दावाच बुक्कल यांनी केली.

बुक्कल नवाब म्हणाले की, जवळपास 100  नावं अशी आहे जी हनुमान नावावर आधारीत आहे. हिंदू समाज हा हनुमान नाव ठेवतो. परंतु, सुल्तान, अरमान, रहमान, रमजान नाही ठेवू शकत. याआधी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थान इथं एका प्रचार सभेत हनुमान हा दलित असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

बुक्कल नवाब यांच्या विधानानंतर राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी समाजावादी पक्षाचे एमएलसी राजपाल कश्यप यांनी म्हटलंय की, योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे मंत्री हनुमानाची जात सांगत आहे. आदित्यनाथ यांनी हनुमानाला आधीच दलित असल्याचं सांगितलं होते. तर भाजपचे एक मंत्री हनुमान जाट असल्याचं सांगत आहे.  आता बुक्कल नवा यांनी हनुमानाला मुस्लीम असल्याचं सांगितलं. एवढंच नाहीतर उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी सीता यांना टेस्टट्यूब बेबी असल्याचं म्हटलं होतं. यावरून सरकारमध्ये मतभेद चव्हाट्यावर आले आहे अशी टीका त्यांनी केली.

बुक्कल नवाब यांच्या विधानावर काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते दीपक सिंह यांनी भाजपने आधी ठरवावं की हनुमानाची जात काय आहे? असा खोचक सवाल उपस्थितीत केला आहे. तसंच आम्हाला फक्त हनुमान हे सर्व समाजासाठी देव आहे. ते पवनसुत हनुमान आहे आणि ते सर्वांसाठी प्रमुख देवांपैकी एक आहे असा टोलाही सिंह यांनी भाजपला लगावला.

============================

First published: December 20, 2018, 7:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading