Home /News /national /

कारगारांनी भरलेल्या बसचा हायवेवर भीषण अपघात, 25 मजूर जखमी

कारगारांनी भरलेल्या बसचा हायवेवर भीषण अपघात, 25 मजूर जखमी

लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर दुभाजकावर 24 हून अधिक कामगार जखमी झाले आहेत, त्यापैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

    कानपूर, 15 जून : रविवारी रात्री कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. बस दुभाजकावर अडळल्याने बसचा अपघात झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. आनंद बिहारहून दिल्लीतील मुझफ्फरपूरकडे जाताना वळणावर लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर दुभाजकावर बस धडकली. यात तब्बल 24 हून अधिक कामगार जखमी झाले आहेत, त्यापैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमी झालेल्या 3 प्रवाश्यांना कानपूरच्या हलत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसा, बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. हे सर्व दिल्लीतील कारखान्यात काम करणारे मजूर आहेत, जे त्यांच्या स्वत: च्या खासगी बसमधून आपल्या राज्यात व जिल्ह्यांसाठी दिल्लीहून निघाले होते. सुदैवाने या अपघातामध्ये कोणाचाही मृत्यू झाल्याचं वृत्त नाही. ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे झाला अपघात बस दिल्लीहून लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस हायवेकडे येताच बिल्होर पोलीस स्टेशन परिसराच्या वळणावर दुभाजकावर आदळली. ड्रायव्हरच्या झोपेमुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. बस अपघाताची माहिती मिळताच बिल्हौर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष अवस्थी फोर्ससह घटनास्थळी दाखल झाले आणि रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना सीएचसीमध्ये दाखल केलं. बसमधले 25 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजताच खळबळ उडाली. घाईघाईने अधिकारी व आरोग्य अधिकारी सीएचसीला पोहोचले. सर्व मजूर बिहारमधील मुझफ्फरपूर इथले रहिवासी आहेत. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या