आता दर महिन्याला सिलेंडर 4 रुपयांनी महागणार, पुढील वर्षी सबसिडी होणार रद्द

आता दर महिन्याला सिलेंडर 4 रुपयांनी महागणार, पुढील वर्षी सबसिडी होणार रद्द

  • Share this:

31 जुलै :  आता अनुदानित मिळणाऱ्या सिलेंडरवर दरमहिन्याला 4 रुपये वाढ होणार आहे. केंद्र सरकारने इंधन कंपन्यांना तसे आदेश दिले आहे. त्यामुळे पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत अनुदानित सिलेंडरवर मिळणारी सबसिडी रद्द होईल.

केंद्र सरकारने इंडियन आॅईल काॅरप्रोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम काॅरप्रोरेशन (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम काॅरप्रोरेशन (HPCL) या कंपन्यांना एलपीजीच्या दरात दर महिन्याला 2 रुपये वाढ करण्यास सांगितलं होतं. पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, यापुढे या दरात दुपट्टीने वाढ करण्यात आलीये.  ज्यामुळे सबसिडी कायम स्वरुपात रद्द केली जाईल. प्रत्येक घरात प्रत्येकी 12 अनुदानित सिलेंडर मिळतात. त्यानंतर त्यांना बाजारभावाप्रमाणे सिलेंडर खरेदी करावा लागतो.

मुंबईमध्ये सध्या 14.2 किलोग्रॅम अनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत 488 रुपये आहे. तर विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 554 रुपये आहे. जुलै महिन्यात एलपीजीवर 86.54 रुपये सबसिडी होती.

देशात अनुदानित सिलेंडर घेणाऱ्यांची संख्याही 18.11 कोटी आहे.यात 2.5 कोटी गरीब महिलांचा समावेश आहे, ज्यांनी मागील वर्षी पंतप्रधान उज्जवला योजनेतून कनेक्शन घेतलंय अशी माहिती प्रधान यांनी दिली.

First published: July 31, 2017, 9:43 PM IST

ताज्या बातम्या