नववर्षाची भेट, सिलेंडरच्या दरात मोठी कपात

नववर्षाची भेट, सिलेंडरच्या दरात मोठी कपात

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गॅसच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे सिलेंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला इंधन कंपन्यांनी नववर्षाची भेट दिली आहे. विना अनुदानित सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे. विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात 120.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर अनुदानित सिलेंडरच्या दरही 5.91 रुपयांची स्वस्त होणार आहे. नवे दर आज मध्यरात्रीपासून अर्थात 1 जानेवारी 2019 पासून लागू होणार आहे.

सिलेंडरच्या दरात कपात कशामुळे?

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गॅसच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे सिलेंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय डाॅलरच्या तुलनेत रुपयाची किंमती वाढली आहे. त्यामुळे घरगुती सिलेंडरच्या दर कमी करण्यात आले आहे. नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

सुधारीत सिलेंडरचे दर

सध्या दिल्लीमध्ये विनाअनुदानित सिलेंडरचे दर हे 809.50 रुपये आहे. कपात झाल्यानंतर हेच सिलेंडर आता 689 रुपयांनी मिळणार आहे. तर अनुदानित सिलेंडरचे नवे दर हे 494.99 रुपये असणार आहे. आधी हे दर 500.90 रुपये होते.

सहा वेळा झाली दरवाढ

याआधी जून 2018 नंतर सिलेंडरच्या दरात 6 वेळा वाढ झाली होती. त्यानंतर एकूण 6 वेळा कपातही झाली होती. त्यामुळे 14.13 रुपयांची कपात झाली होती. 1 नोव्हेंबर 2018 रोजी सिलेंडरच्या दरात पुन्हा 2.94 रुपयांची वाढ झाली होती.

==========================

First published: December 31, 2018, 8:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading