Home /News /national /

पुढील 6 तासात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र किनारपट्टीला धडकणार; जाणून घ्या 'जवाद' चक्रीवादळाची स्थिती

पुढील 6 तासात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र किनारपट्टीला धडकणार; जाणून घ्या 'जवाद' चक्रीवादळाची स्थिती

Cyclone Jawad Latest Update: गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंगालच्या उपसागरात (Bay Of Bengal) 'जवाद' चक्रीवादळाचं (Cyclone jawad) संकट घोंघावत होतं. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला होता.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 05 डिसेंबर: गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंगालच्या उपसागरात (Bay Of Bengal) 'जवाद' चक्रीवादळाचं (Cyclone jawad) संकट घोंघावत होतं. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर तीव्र पावसाचा (heavy rainfall) इशारा देण्यात आला होता. पण आता जवाद चक्रीवादळ मंदावलं आहे. या जवाद चक्रीवादळाचं रुपांतर पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रात झालं आहे. हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र पुढील सहा तासात ओडिशा किनारपट्टीवरील पुरी याठिकाणी धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने आज दक्षिण भारतासह ओडिशा किनारपट्टीवर अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील तीन ते चार तासात याठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान वेगवान वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत ओडिशा किनारपट्टीजवळील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र उत्तर दिशेनं पुढे सरकार असून ते ईशान्य भारताकडे प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या तीन चार दिवसांत ईशान्य भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस याठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हेही वाचा-भयानक! शाळा-कॉलेजमध्ये Coronaची भीती, 69 विद्यार्थी-शिक्षक पॉझिटिव्ह दुसरीकडे, महाराष्ट्रात मात्र पुढील पाचही दिवस कोरड्या हवामानाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज रायगड आणि ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात धुक्याचे साम्राज्य पसरल्यानंतर, मुंबईसह पुणे आणि कोकण परिसरात अल्हाददायक वातावरण तयार झालं आहे. तसेच तापमानात किचिंतशी वाढही नोंदली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Weather forecast

    पुढील बातम्या