मराठी बातम्या /बातम्या /देश /सावधान! ‘गुलाब’नंतर आता ‘शाहीन’चा प्रभाव, गुरुवारी गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱपट्टीवर ALERT

सावधान! ‘गुलाब’नंतर आता ‘शाहीन’चा प्रभाव, गुरुवारी गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱपट्टीवर ALERT

गुलाब चक्रीवादळाचा एक भाग वेगळा (Low pressure area in Gujrat to form Shaheen cyclone in next 2 days) होऊन तयार झालेल्या शाहीन चक्रीवादळाचा फटका गुजरात आणि महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याला बसण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : गुलाब चक्रीवादळाचा एक भाग वेगळा (Low pressure area in Gujrat to form Shaheen cyclone in next 2 days) होऊन तयार झालेल्या शाहीन चक्रीवादळाचा फटका गुजरात आणि महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याला बसण्याची शक्यता आहे. गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गुजरात किनारपट्टी भागात कमी दाबाचं (Low pressure area formed) क्षेत्र निर्माण झालं असून याचा प्रभाव गुरुवारी सर्वाधिक असेल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

‘गुलाब’ होणार ‘शाहीन’

1 ऑक्टोबरपासून गुलाब चक्रीवादळाचा एक भाग वेगळा होऊन त्याचं शाहीन चक्रीवादळ होणार असल्याचं हवामान विभागाचे वरीष्ठ शास्त्रज्ञ आर. के. जेनमानी यांनी म्हटलं आहे. याचा प्रभाव गुजरात आणि महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर जाणवणार असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे समुद्रात भरती येण्याची शक्यता असून उंचच उंच लाटा किनाऱ्यावर धडकतील, असं सांगण्यात आलं आहे. 3 ऑक्टोबरपर्यंत ही स्थिती कायम राहिल, असं सांगण्यात आलं असून पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

हवामान विभागाचा अंदाज

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. हे दाबक्षेत्र हळूहळू उत्तरेकडं सरकत असून अरबी समुद्रकिनाऱ्यावर याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. पुढील 2 ते 3 दिवस समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असून गुरुवारी रात्रीपर्यंत याचा प्रभाव सर्वाधिक जाणवेल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

हे वाचा - थरारक! या गावात पसरलीय ‘खुनी साधू’ची दहशत, उचललाय 9 जणांच्या हत्येचा विडा

गुजरातकडून पाकिस्तानकडे

पुढील तीन दिवसांनंतर हा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकणार असून तो पाकिस्तानच्या दिशेने सरकणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. मात्र तोपर्यंत गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Cyclone, Gujrat, Sea