जौनपूर, 18 जून: देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Infection) दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये (Jaunpur) गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. कोरोना परिस्थितीचा फायदा घेऊन पळून जाऊन लग्न करण्यात प्रियकरांनी नकार दिल्यानं दोन मैत्रिणींनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा.. सासू आणि पत्नीच्या गर्भातील अर्भकाचा खून केल्याप्रकरणी पतीला फाशीची शिक्षा!
मिळालेली माहिती अशी की, खेतासराय पोलिस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे. दोन मैत्रिणींनी एकाच वेळी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रकृती बिघडल्यानंतर दोन्ही तरुणींना तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आलं. मात्र, एका तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर दुसरीची प्रकृती स्थीर झाल्यानंतर तिला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दोन्ही तरुणींचे गावातीलच दोन तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही तरुणींची आपापल्या प्रियकरांसोबत पळून जाऊन लग्न करण्याची इच्छा होती. ही इच्छा दोघींना आपापल्या प्रियकरासमोर बोलून दाखवली होती. कारण दोघींना आपापल्या नातेवाईक भीती होती.
पळून जाऊन लग्न करण्याचा घेतला होता निर्णय, पण...
दोन्ही मैत्रिणींनी आपापल्या प्रियकरांसोबत पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ऐनवेळी दोघींच्या प्रियकरांनी पळून जाण्यास नकार दिला. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीलर तरुणींच्या प्रियकरांनी पळून जाण्यास नकार दिला. याचा राग आल्याने दोन्ही तरुणींनी एकाच वेळी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा.. धक्कादायक! भिंत अंगावर कोसळून दोन चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू
प्रकृती बिघडल्यानंतर नातेवाईकांनी दोघींना आधी सोंधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. मात्र, एका तरुणीची प्रकृती गंभीर झाल्यानं तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.