Home /News /national /

Love Triangle: 2 शिक्षकांचा एकाच मुलीवर जडला जीव, प्रेमाचा असा अंत की दोघांचाही झाला मृत्यू

Love Triangle: 2 शिक्षकांचा एकाच मुलीवर जडला जीव, प्रेमाचा असा अंत की दोघांचाही झाला मृत्यू

सुरुवातीला दोन्ही शिक्षकांनी एकमेकांना समजवलं नंतर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांना समजवलं पण दोघेही काही ऐकण्यासाठी तयार नव्हते. त्यानंतर सुरू झाला गुन्हेगारीचा प्रवास.

    मिर्जापुर, 19 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांत प्रेम प्रकरणातून गुन्हे घडण्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. आता प्रेमाचा असा लव्ह ट्रायएंगल समोर आला त्यामध्ये दोघांना आपला जीव गमावण्याची वेळ आली. प्रकरण असं की शाळेत शिकवणारे दोन शिक्षक एकाच मुलीच्या प्रेमात पडले. सुरुवातीला दोन्ही शिक्षकांनी एकमेकांना समजवलं नंतर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांना समजवलं पण दोघेही काही ऐकण्यासाठी तयार नव्हते. त्यानंतर सुरू झाला गुन्हेगारीचा प्रवास. दोघांनेही प्रेमात माघार घेण्यासाठी नकार दिला. त्यानंतर एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाला वाटेतून बाजूला काढण्याचा कट रचला आणि त्याची हत्यादेखील केली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे हत्येच्या काही वेळानंतरच आरोपीने स्वत:देखील आत्महत्या केली. हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या मिर्जापूरचे (Mirzapur) आहे. सूरज आणि अनुजची चांगली मैत्री होती शिक्षक सूरज पांडेचा मृतदेह जिल्ह्यातील विंध्याचल पोलीस स्टेशन परिसरातील रपुरी गावात विहिरीत आढळला. पोलिसांनी बुधवारी या प्रकरणाचा खुलासा केला. पोलीस लाइनमध्ये ही घटना उघडकीस आणताना पोलिसांनी सांगितले की, सूरजची त्याच्याबरोबर एकाच शाळेत शिकवत असलेल्या दोन सहकारी शिक्षकांनी गळा आवळून खून केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक सूरज, अनुज आणि रत्नेश हे कुरैठी येथील एचपी तिवारी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक होते. सूरज आणि अनुजची चांगली मैत्री होती. इतर बातम्या - TOPLESS फोटोशूट केल्यानंतर नेटकऱ्यांनी कियारा अडवाणीला घातले कपडे अनुजने आपला साथीदार रत्नेश यांच्यासह 11 फेब्रुवारीला मफलरने सूरजचा गळा आवळून खून केला होता. अनुजचे तीन वर्षांपासून एका मुलीवर प्रेम होते. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून सूरज त्याच मुलीशी फोनवर बोलू लागला. अनुजला हे कळताच त्याने सूरज न बोलण्याची ताकीद दिली. परंतु सूरज ऐकलं नाही म्हणून 11 फेब्रुवारी रोजी अनुजने आपल्या साथीदार रत्नेशसह सूरजची मफलरने गळा आवळून हत्या केली. इतर बातम्या - 'एल्गार'वरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद आहेत का? अजित पवारांनी केला खुलासा हत्येनंतर सूरजचा मृतदेह विहिरीत फेकला. यानंतर सूरजची दुचाकी घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर फेकली. रत्नेश या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती, सूरजच्या हत्येनंतर अनुजनेही 13 फेब्रुवारीला फाशी घेऊन आत्महत्या केली. प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर पोलिसांनी हत्येत सहभागी असलेल्या रत्नेश या साथीदाराला अटक केली आणि सूरजची दुचाकीही जप्त केली. पोलिसांनी रत्नेशला तुरूंगात पाठविले आहे. इतर बातम्या - Tik Tokच्या स्कल चॅलेंजमुळे सांगलीत विद्यार्थी जखमी, तुमची मुलं तर नाही करत चूक?
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Uttar pradesh

    पुढील बातम्या