प्रेमासाठी वाट्टेल ते! बायकोसाठी विमानात तब्बल 6 तास उभा राहिला नवरा

प्रेमासाठी कुणी काय करेल हे सांगता येत नाही. आता असाच एक विमानातला फोटो समोर आला आहे. या व्हायरल फोटोवरून सोशल मीडियावर प्रेमाची चर्चा सुरू झालीय.

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 04:05 PM IST

प्रेमासाठी वाट्टेल ते! बायकोसाठी विमानात तब्बल 6 तास उभा राहिला नवरा

मुंबई, 10 सप्टेंबर : प्रेमासाठी कुणी काय करेल हे सांगता येत नाही. आता असाच एक विमानातला फोटो समोर आला आहे. या व्हायरल फोटोवरून सोशल मीडियावर प्रेमाची चर्चा सुरू झालीय.

विमानामध्ये आपल्या पत्नीला आरामशीर झोपता यावं यासाठी तिच्या पतीने विमानात 6 तास उभं राहून प्रवास केला.

अनेकदा विमानाचा लांबचा प्रवास असेल तर अवघडून जायला होतं. त्यातच 3 सलग सीटवर पहुडायला मिळालं तर किती बरं होईल, असं आपल्यालाही वाटत असतं. पण या महिलेच्या बाबतीत तिच्या पतीच्या त्यागामुळे हे शक्य झालं.विमानातल्या सहप्रवाशाने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. असं मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं, असं म्हणत त्याने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीजणांनी या आपल्या बायकोसाठी हा त्याग करणाऱ्या नवऱ्याचं कौतुक केलं आहे पण काहीजणांनी त्या महिलेला स्वार्थी म्हणून हिणवलं आहे.

असं असलं तरी या फोटोवर अनेकांनी नवरा - बायकोच्या नात्याबद्दल सुंदर कमेंट्सही केल्या आहेत. नवरा -बायको एकमेकांच्या सुखासाठी किती धडपडत असतात हेच यावरून दिसतं असं अनेकांचं म्हणणं आहे.हा फोटो नुसताच व्हायरल झाला नाही तर त्यावर कमेंट करणाऱ्यांचं प्रमाणही मोठं आहे.

काही युजर्सनी हा फोटो खरा आहे का, असंही विचारलं आहे. फ्लाइट अटेंडंटने या माणसाला इतका वेळ उभंच कसं राहू दिलं, असाही प्रश्न काहींनी विचारला आहे.

आईच्या शरीराखाली गुदमरून 3 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

=============================================================================

VIDEO : आदित्य ठाकरे लालबाग राजाच्या चरणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 04:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...