Home /News /national /

प्रेम, सेक्स, धोका आणि भयावह हत्याकांड; कुटुंबातील 5 जणांची हत्या करून शेतात पुरलं

प्रेम, सेक्स, धोका आणि भयावह हत्याकांड; कुटुंबातील 5 जणांची हत्या करून शेतात पुरलं

गेल्या 47 दिवसांपासून अख्खं कुटुंबच्या कुटुंब गायब झाल्यानं गावात खळबळ उडाली होती.

    भोपाळ, 5 जुलै : गेल्या 47 दिवसांपासून बेपत्ता दलित कुटुंबातील पाच सदस्य अखेर देवासमधील नेमावरमध्ये 29 जून रोजी सापडले. हे ठिकाण इंदूरपासून 40 किलोमीटर लांब आहे. हे सर्वजण पूर्णपणे निर्वस्त्र होते आणि त्यांच्या शरीरावर जखमाच्या खुणा होत्या. एका मोठ्या शेतात 10 फूट खोल खड्ड्यात त्यांना दफन करण्यात आलं होतं. मृतांमध्ये चार तरुणी आणि एक मुलगा होता. ही सर्वजण एकाच कुटुंबातील होती. यापैकी तीन अल्पवयीन होते. जेथे मृतदेह गाडण्यात आले, त्या शेताचा मालक आणि त्याचा भाऊ या घटनेत सामील होते. यामुळे सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. मृतांमध्ये कास्ते (45), त्यांची मुलगी रूपाली (21), दीपाली (14), आणि चुलत बहीण-भाऊ पूजा आणि पवन ओसवाल (15-14) सामील होते. सर्वांना आधी निर्वस्त्र करण्यात आलं. आणि त्यानंतर एक एक करीत चाकूने हत्या करण्यात आली. आणि 10 फूट खोल खड्ड्यात दफन करण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, खड्ड्यात यूरिया आणि मीठही टाकण्यात आलं होतं. ज्यामुळे मृतदेह लवकर विघटन पावतो. याशिवाय पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहांवरील कपडे काढून जाळण्यात आले होते. याची सुरुवात 17 मे रोजी झाली. जेव्हा भारती, ममता यांची मुलगी पीथमपुरमध्ये राहते. नेमावर येथील आपलं कुटुंब बेपत्ता झाल्याची तक्रार तिने पोलिसात केली होती. कुटुंब कुठे गेलं याबद्दल कोणालाच माहीत नव्हतं. पोलिसांनी अनेक ठिकाणी तपास केला. त्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली, ज्यात रुपालीच्या फोनचं लोकेशन सातत्याने बदलत होतं. रुपालीच्या फोन नंबरवर तिचं सोशल मीडिया अकाऊंटदेखील नियमित अपडेट होत होतं. पोलिसांनी पाहिलं की, अपडेटमध्ये रुपालीच्या नंबरवरुन जुने फोटो आणि पोस्ट केले जात होते. पोलिसांना यात शंका आली. यादरम्यान, रुपालीचा फोन सक्रिय होता आणि तिच्या क्रमांकासह सोशल मीडियावर अपडेट होत होती. हे कुटुंब इतर कुठे तरी गेल्याचा पोलिसांना संशय आला. विशेष म्हणजे पोलीस तपास करत असतांना मुख्य आरोपी सुरेंद्रसिंग राजपूत (वय 25) यांच्यासह रुपालीचा मामा या प्रकरणात त्वरित तोडगा काढण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. आणि याच कारणामुळे ते पोलिसांच्या रडारपासून दूर होते. हे ही वाचा-लॉकडाऊनमध्ये घरबसल्या नको ते उद्योग;आता बॉसची भीती दाखवून प्रेयसी करते BlackMail दरम्यान, पोलिसांना एक लीड मिळाली ज्यातून समजलं की रुपालीचे सुरेंद्र राजपूतसोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांनी आता त्यांच्या तपासाची दिशा बदलून ती सुरेंद्र आणि त्याच्या सहकाऱ्यांकडे वळविली. हे कुटुंब गावात वचक असणाऱ्या कुुटुंबापैकी एक आहे. दोघांच्यात प्रेमसंबंध सुरू असल्याचे रुपालीच्या कॉल रेकॉर्डने पुष्टी केली होती. काही दिवसांच्या तपासणीनंतर त्याला राजपूत कुटुंबामध्ये काम करणाऱ्या एका कर्मचार्‍याकडून महत्त्वाची माहिती मिळाली. आणि अखेर 26 जून रोजी पोलिसांनी सुरेंद्र आणि त्याच्या पाच साथीदारांना अटक केली आणि तपासणी दरम्यान त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर जेसीबीकडून राजपूत कुटुंबाच्या शेतात उत्खनन करताना मृतदेह सापडले, ज्याचा अक्षरश: सांगाडा झाला होता. त्याच दिवशी सातवा आरोपी राकेश जिमोरे जो रुपालीचा फोन वापरत होता, आणि सातत्याने लोकेशन बदलत होता. त्याला खंडव्यातून पकडण्यात आलं. तो जाणूनबुजून आपलं लोकेशन बदल होता आणि फेसबुकवर पोस्ट करीत होता. हे ही वाचा-पतीला सोडून सासऱ्यासोबत थाटला तरुणीने संसार, RTI टाकल्यानंतर सिक्रेट झालं उघड या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, बऱ्याच तपासानंतर शेवटी महत्त्वाची बाब समोर आली आहे. ते पुढे म्हणाले की, संपूर्ण कुटुंबाच्या हत्येचा आरोप असलेल्या सुरेंद्र राजपूत यांचे रुपालीशी प्रेमसंबंध असल्याचे आढळून आले आणि मात्र त्याचं लग्न इतर ठिकाणी ठरलं होतं. ज्यात रुपालीचं कुटुंब अडथळा ठरत होता. सुरेंद्र सोबत त्याचा भाऊ वीरेंद्र, राजकुमार कीर, विवेक तिवारी, करण, मनोज कोरकू आणि राकेश निमोर हेदेखील या गुन्ह्यात सहभागी होते. राकेश आणि वीरेंद्र हे सध्या पोलीस कोठडीत आहेत तर इतर सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरेंद्र आणि रुपालीचे नात्यात का आला दुरावा? सुरेंद्र नेमावारमधील एका श्रीमंत कुटुंबातील आहे. त्याचे तीन वर्षांपासून रुपालीसोबत प्रेमसंबंध होते. त्याचे लग्न दुसरीकडे ठरल्याचं कळाल्यामुळे रुपाली नाराज झाली होती. तिने त्या तरुणीला उद्देशून  इन्स्टाग्रामवर एक आक्षेपार्ह पोस्ट केली. येथूनच सुरेंद्रचा पारा चढला व त्याने रुपालीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्याचे लग्न कोणा दुसऱ्यासोबत ठरल्याचं सत्य ती मान्य करण्यास तयार नव्हती. रुपालीच्या कुटुंबाची कशी केली हत्या? 13 मे रोजी रात्री ठरलेल्या योजनेनुसार सुरेंद्रने रुपालीला लग्नाविषयी बोलण्यासाठी त्याच्या शेताला बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर तिच्या डोक्यावर रॉडने वार करून तिची हत्या केली. आणि मग तिला तेथेच शेतात पुरले. नंतर त्याने भावाला रुपालीची आई आणि बहिण दिव्याला बोलण्यासाठी रूपालीच्या घरी पाठविले, त्यावेळी पूजा आणि पवनही तेथे होते. सुरेंद्रने त्या सर्वांची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार हा खड्डा ट्रान्सफॉर्मरसाठी खोदण्यात आला होता, ज्यात मृतदेह दफन करण्यात आले. ममता यांची मुलगी पीथमपूर येथे काम करत होती. जेव्हा 17 मे रोजी ती घरी पोहोचली तेव्हा घरात कोणीच नव्हतं. तिने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Gang murder, Madhya pradesh

    पुढील बातम्या