Home /News /national /

लव्ह, सेक्स, धोखा..! Facebook वर जमलं प्रेम आणि Whatsapp वरून दिला तीन तलाक

लव्ह, सेक्स, धोखा..! Facebook वर जमलं प्रेम आणि Whatsapp वरून दिला तीन तलाक

या महिलेने आता पोलिसांत दाद मागण्याचा प्रयत्न केला आहे. वारंवार शारीरिक आणि मानसिक हिंसा झाल्याचाही आरोप केला आहे.

    बुलंद शहर (उत्तर प्रदेश), 05 मे : फेसबुकवरून प्रेम जमलेल्या जोडप्यातील पतीने पत्नीला व्हाट्सअपवरून तीन तलाक (Triple Talaq on whatsapp) दिल्याची घटना समोर आली आहे. शिकारपूर पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली, सहा वर्षांपूर्वी फेसबुकवरून (Facebook) एका मुलीशी प्रेमसंबंध जन्मल्यानंतर संबंधित युवकाने तिच्याशी निकाह केला. मात्र, या मुलीचे आयुष्य आता उद्ध्वस्त झाले आहे. कारण त्यानं तिला तिहेरी तलाक (Triple Talaq) दिला आहे. या जोडप्याला दोन मुले असून संबंधित महिलेने पतीवर फसवणुकीचा आरोप केला आहे. ही महिला मूळची छत्तीसगडची असून तिच्या पतीने मुलांचाही ताबा तिच्याकडून काढून घेतला आहे. तसेच या महिलेने वारंवार शारीरिक आणि मानसिक हिंसा झाल्याचाही आरोप केला आहे. सध्या ही महिला न्यायासाठी एसएसपी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. तिने शिकारपूर पोलीस ठाण्यातही दाद मागण्याचा प्रयत्न केला, मात्र विविध कायदेशीर बाबी सांगत तिला महिला सल्ला केंद्रात जाण्यास सांगण्यात आल्याचे तिने म्हटले आहे. सध्या ही महिला पोलीस ठाणे न्यायालय अशा सगळ्या ठिकाणी फिरून-फिरून थकली असल्याचे तिने सांगितले. मात्र, न्यायासाठी शेवटच्या श्वासापर्यंत निर्धारही तिने व्यक्त केला आहे. मात्र, आतापर्यंत या महिलेला कोणीही मदत केलेली नाही. निराश होऊन ही महिला अखेर आत्महत्या करण्याचा विचार करत आहे. हे वाचा - धक्कादायक! कोरोनामुळे आणखी एका मराठी कलाकाराचा बळी, ‘बापमाणूस’ फेम अभिनेत्रीचं निधन आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे आणि इंटरनेटही माफक दरात उपलब्ध होत असल्याने अनेकजण त्याचा चांगला उपयोग करण्याऐवजी चुकीची माहिती, फसवणूक होणाऱ्या बाबींना बळी पडल्याचे प्रकार समोर आले आहेत. अनेकजण कामे सोडून सोशल मीडियावर तासन् तास पडून असल्याचे दिसते. त्यामध्येही रिकामं डोकं, सैतानाचं घर या म्हणीप्रमाणे अनेकजण सोशल मीडियावर जास्त वेळ विनाकारण पडून राहिल्याने फसवणूक करणाऱ्या लोकांच्या संपर्कात येतात. सोशल मीडियावर अनोळखी लोकांच्या कोणत्याही अमिषांना बळी पडू नये, असे सायबर, पोलीस प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत असले तरीही लोक चुका करतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Love, Social media viral

    पुढील बातम्या