मराठी बातम्या /बातम्या /देश /शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीचं शिक्षकावरच जडलं प्रेम; मंदिरात गुपचूप लग्न करून पोलीस ठाणं गाठलं

शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीचं शिक्षकावरच जडलं प्रेम; मंदिरात गुपचूप लग्न करून पोलीस ठाणं गाठलं

या शिक्षक आणि विद्यार्थीनीने (teacher student marriage) लग्न करून थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांकडे आपल्या सुरक्षेची मागणी केली. या घटनेची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

या शिक्षक आणि विद्यार्थीनीने (teacher student marriage) लग्न करून थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांकडे आपल्या सुरक्षेची मागणी केली. या घटनेची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

या शिक्षक आणि विद्यार्थीनीने (teacher student marriage) लग्न करून थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांकडे आपल्या सुरक्षेची मागणी केली. या घटनेची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

धनबाद, 13 जून : शिक्षिका आणि विद्यार्थी यांचे प्रेमसंबंध असल्याच्या अनेक घटना अलीकडे समोर आल्या आहेत. अशाच एका घटनेत एका विद्यार्थिनीचे शिक्षकावर प्रेम जडले (teacher student affair) गेले आणि दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. विशेष म्हणजे या शिक्षक आणि विद्यार्थीनीने (teacher student marriage) लग्न करून थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांकडे आपल्या सुरक्षेची मागणी केली.

या घटनेची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. हा सर्व प्रकार झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील आहे. येथील सुवरिया गावच्या शिक्षक आणि विद्यार्थिनी हे दोघेही लग्न करून धनबाद येथील महिला पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. त्यांनी पोलिसांकडे आपल्याला सुरक्षा देण्याची मागणी लावून धरली. संबंधित प्रियकर हा मुलीला शिकवण्याचे काम करायचा. या दोघांचे काही दिवसांनी प्रेम संबंध जुळले. दोघेही एकमेकांवर प्रेम करायचे, मात्र दरम्यान मुलीचे तिच्या कुटुंबीयांनी लग्न करण्याचे ठरवले. त्यावेळी दोघांनीही घरच्यांना आपल्या प्रेम प्रकरणाविषयी माहिती देऊन लग्न करणार असल्याचे सांगितले. मात्र, या लग्नासाठी घरच्या व्यक्तींनी परवानगी दिली नाही. शिक्षकासोबत असे लग्न होणार नाही, असे त्यांनी मुलीला सांगितले. मात्र, मुलीला काही झाले तरी शिक्षकांचीच लग्न करायचे होते.

चार वर्षांपासून होते अफेअर

कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर या दोघांनी लवकरात लवकर लग्न करण्याचे ठरवले. परिसरातील भुईफोड मंदिरात जाऊन दोघांनी लग्न केलं. त्यानंतर ते थेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि त्यांनी पोलिसांना आपण गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचे सांगितले. आम्ही लग्न केले आहे मात्र आमच्या कुटुंबीयांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे आम्हाला सुरक्षा हवी आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित दोघांच्याही कुटुंबीयांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले. लग्नाविषयी सर्वांची समजूत काढण्यात आली. मात्र, तरीही मुलीच्या कुटुंबीयांना या लग्नाला मान्यता देत नव्हते. पण, हे दोघे मात्र ठाम होते. महिला पोलीस अधिकारी नंदिनीकुमार यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या कुटुंबियांचा या लग्नाला तीव्र विरोध आहे, मात्र मुलगी शिक्षकासोबतच राहण्यासाठी आग्रह करत आहे.

First published:
top videos

    Tags: Love story, Student, Teacher