Home /News /national /

हिंदू तरुणीचं मुस्लीम तरुणाशी होणारे लग्न पोलिसांनी थांबवले, काय आहे कारण वाचा

हिंदू तरुणीचं मुस्लीम तरुणाशी होणारे लग्न पोलिसांनी थांबवले, काय आहे कारण वाचा

लव्ह जिहाद (Love Jihad) प्रकरणात योगी सरकारने (Yogi Government) ने कायदा केल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस (UP Police) सक्रीय झाले आहेत. नव्या बेकायदेशीर धर्मांतरण बंदी (Unlawful conversion) कायद्यानुसार लखनऊमध्ये होत असलेले एक भिन्न धर्मीय लग्न पोलिसांनी रोखले. लखनऊमध्ये एका मुस्लीम तरुणाचे हिंदू तरुणीशी लग्न होणार होते.

पुढे वाचा ...
    लखनऊ, 5 डिसेंबर :  स्वत:चं नाव आणि धर्म लपवून परधर्मातील मुलींशी लग्न करण्याच्या घटना देशात अनेक ठिकाणी उघडकीस आल्या आहेत. या प्रकारच्या लग्नांना हिंदूत्ववादी संघटनांनी  लव्ह जिहाद (Love Jihad) असे नाव ठेवून सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. या वाढत्या विरोधाची दखल घेतल भाजप (BJP ) शासित राज्यांनी लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याची तयारी सुरु केलीय. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) योगी सरकारने (Yogi Government)  यामध्ये आघाडी घेत सर्वप्रथम राज्यात कायदा लागू केला. उत्तर प्रदेश सरकारच्या या नव्या बेकायदेशीर धर्मांतरण बंदी (Unlawful conversion) कायद्यानुसार लखनऊमध्ये होत असलेले एक भिन्न धर्मीय लग्न पोलिसांनी रोखले. लखनऊमध्ये एका मुस्लीम तरुणाचे हिंदू तरुणीशी लग्न होणार होते. लग्नाचे विधी सुरु होण्याच्या थोडाच वेळ आधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हे लग्न थांबवले. काय होते प्रकरण? लखनऊचे वरीष्ठ पोलीस अधिकारी सुरेशचंद्र रावत यांनी याबाबत मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, ‘हे भिन्नधर्मीय लग्न 2 डिसेंबरला होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लग्न थांबवले आणि दोन्हीकडील मंडळींना पोलीस स्टेशनमध्ये येण्याची सूचना केली.पोलिसांनी वऱ्हाडी मंडळींना नव्या कायद्याची प्रत दिली असून दोन्ही पक्षांनी ती स्विकारली आहे,’’ असे रावत यांनी सांगितले. पुढे काय होणार? उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतरण बंदी कायद्यानुसार दोन्ही पक्षांना विवाहाची जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीनंतरच भिन्नधर्मीय लग्न होऊ शकते. लखनऊच्या वऱ्हाडी मंडळींनी देखील पोलिसांची ही सूचना मान्य केली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीनंतरच ती मंडळी हे लग्न करणार आहेत. काय आहे कायदा? उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतरण बंदी कायद्यानुसार जबरदस्तीने, खोटं बोलून किंवा आमिष दाखवून केलेले धर्मपरिवर्तन किंवा लग्नासाठी धर्मपरिवर्तन हा अजामीनपात्र गुन्हा आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास 15 हजार रुपये दंड आणि एक ते पाच वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. धर्म परिवर्तनासाठी किमान दोन महिने आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे फॉर्म भरुन देणे आवश्यक आहे. त्याचे उल्लंघन केल्यास सहा महिने ते 3 वर्षापर्यंतची शिक्षा आणि किमान दहा हजार रुपये दंड होऊ शकतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Love jihad, Uttar pradesh

    पुढील बातम्या