राजकारणातील प्रेमप्रकरणं आणि बरचं काही..धनंजय मुंडेंप्रमाणे आणखी कोण-कोणते नेते होते चर्चेत?

राजकारणातील प्रेमप्रकरणं आणि बरचं काही..धनंजय मुंडेंप्रमाणे आणखी कोण-कोणते नेते होते चर्चेत?

देशाच्या माजी पंतप्रधानांची केलेल्या एका वक्तव्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली होती. काही नाव वाचून तर तुम्हाला धक्काच बसेल.

  • Share this:

पुणे, 14 जानेवारी :  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या गायिकेनं थेट लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने त्याचं मंत्रिपदच धोक्यात आलं आहे. मात्र असे आरोप झालेले हे एकमेव मंत्री नाहीत. (Love affairs in politics) तर यापूर्वीही अनेक नेत्यांची प्रेमप्रकरणं देशासमोर आली आहेत.

राजकीय नेते आणि प्रेमप्रकरणं याचा लेखाजोखा मांडायचा झाला तर या आरोपातून अगदी पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी देखील सुटलेले नाहीत. मग बाकीच्यांची काय कथा. तरीही आपण या रिपोर्टमधून फक्त जगजाहिर झालेली प्रेमप्रकरणं आणि त्यामुळे अडचणीत आलेल्या नेत्यांचा धांडोळा घेणार आहोत.

1 - या यादीत अगदी राष्ट्रीय स्तरावर सर्वात गाजलेलं नाव म्हणजे माजी दिवंगत केंद्रीय मंत्री एन. डी. तिवारी यांचं घेता येईल. त्यांच्यावर या प्रकरणात थेट खटलाच दाखल करण्यात आला होता. अखेर त्यांनी उतारवयात त्या महिलेला आणि त्या मुलाचा देखील जाहीरपणे स्वीकार केला. तेव्हा कुठे हे प्रकरण शमलं.

2 - त्यानंतर काँग्रेसचे दिवंगत नेते रामराव आदिक. यांच्यावर एका हवाईसुंदरीने विमानात तिचा हात धरल्याचा आरोप केला होता. हे प्रकरणही त्यावेळी खूप गाजलं होतं. परंतू नंतर ही राजकीय कुरघोडी असल्याचं समोर आलं. याशिवाय मध्यंतरी केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्यावरही एका महिलेनं थेट बलात्काराचा आरोप करून मोठी खळबळ उडवून दिली होती.

हे ही वाचा-धक्कादायक! बाल लैंगिक शोषण करणाऱ्या बडतर्फ BJP नेत्याचा किळसवाणा VIDEO आला समोर

3 - संघ परिवारात तर संजय जोशीसारख्या उच्चपदस्थ प्रचारकाचं तर केवळ एका कथित सीडी प्रकरणामुळे संपूर्ण करिअरच संपुष्टात आल्याचं जगजाहीर आहे. याउलट माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी तर "मै अविवाहित हू लेकिंग ब्रम्हाचारी नही" असं जाहीरपणे सांगून त्यावेळच्या गॉसिपला पूर्णविराम दिला होता. राष्ट्रीय बंद सम्राट आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस हे तर त्या काळात 'लिव्ह इन'मध्ये राहत असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. (Love affairs in politics) दुसरीकडे गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी यांना देखील जुन्या सिडी व्हायरल करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला होता. पण या दोघांनीही जाहीरपणे त्या रासलीलांचं समर्थन करून विरोधकांचं तोंड बंद केलं होतं.

हे ही वाचा-ब्लॅकमेल, दबाव आणि राजीनामा: धनंजय मुंडे यांच्याविषयीचे 3 ताजे अपडेट

महाराष्ट्राच्या राजकारणात तर "दोन बायका ऐन फजिती ऐका" अनेक किस्से वेळोवेळी चवीने चर्चिले जातात. पण तुर्तास आपण फक्त जगजाहीर झालेल्यांचीच यादी बघुयात...

4 - फडणवीस सरकारच्या काळात तर विदर्भातील भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या दोन बायकांमधली फ्रिस्टाईल मारामारी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली होती.  याशिवाय एका विद्यमान मंत्र्याला तर तीन-चार वर्षांपूर्वी त्यांच्या खऱ्या पत्नीने थेट आमदार निवासातच रेडहँड पकडून चोप दिला होता. मराठवाड्यातील एका माजी मंत्र्याने तर शपथविधीलाच चक्क पत्नी क्रमांक 1 आणि पत्नी क्रमांक 2 असे पास काढून मोठी खळबळ उडवून दिली होती. पण नंतर हे प्रकरण शांत झालं. मराठवाड्यातील माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावरही दुसऱ्या पत्नीचे नाव लपवल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी केला होता. (Love affairs in politics) ही झाली चव्हाट्यावर आलेली प्रकरणं. पण प्रकाशझोतात न आलेली पण राजरोस सुरू असलेली नेत्यांची प्रेमप्रकरणंही खूप मोठी असल्याचे सांगितले जाते.

हे ही वाचा-Inside Story : धनंजय मुंडेंबद्दल मोठी अपडेट; NCP च्या गोटातून आली बातमी

राज्याच्या राजकारणात खरंतर नेत्यांची प्रेमप्रकरण किंवा लफडी तशी क्वचितच बाहेर येतात. पण धनंजय मुंडे यांचे काका स्वर्गीय लोकनेते मंत्री हे देखील युतीच्या काळात "बरखा बहार आई" प्रकरणामुळे काहीसे अडचणीत आले होते. पण त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे..."प्यार किया तो डरना क्या... ?" असं सांगून गोपिनाथरावांची पाटराखण केली होती. (Love affairs in politics) त्यामुळे आताच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान असलेले उद्धव ठाकरे हे धनंजय मुंडेंना या प्रकरणातून वाचवणार का? हेच पाहाणं औत्सुक्याचे ठरेल.

Published by: Meenal Gangurde
First published: January 14, 2021, 5:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading