आता पासपोर्टवर दिसणार ‘कमळ’, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले कारण

आता पासपोर्टवर दिसणार ‘कमळ’, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले कारण

'सरकारी संस्थांचे भगवेकरण करण्याचा भाजपने घाट घातला आहे', अशी टीका विरोधकांनी संसदेत केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : केवळ प्रवासासाठीच नाही तर एक महत्त्वपूर्ण ओळखपत्र आणि कागदपत्र म्हणून देखील पासपोर्टचे महत्त्व अधिक आहे. एवढच नाही तर या पासपोर्टने प्रत्येक देशाच्या ताकदीची ओळख होते. दरम्यान आता तुमच्या पासपोर्टवर कमळाचे चिन्ह दिसणार आहे. केरळच्या कोझिकोड येथे कमळाचे चिन्ह असलेल्या पासपोर्टचे वाटप करण्यात आले. यानंतर थेट संसदेत हा मुद्दा गाजला. भाजपचे निवडणुक चिन्ह असलेल्या कमळाचा वापर पासपोर्टवर करण्यात आल्यामुळं विरोधकांनी जोरदार टीका केली. विरोधांची आक्रमकता पाहून लगेच परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं याबाबत खुलासा केला आहे.

पासपोर्टवर कमळाचा वापर करण्यात आल्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयानं हे राष्ट्रीय फुल असून देशाचे प्रतिक असल्याचे सांगत सारवासारव केली, तसेच, सुरक्षेच्या कारणास्थव हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयानं सांगितले. केरळमध्ये या पासपोर्टचे वाटप करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे खासदार एम. के. राघवन यांनी लोकसभेत हा मुद्दा लावून धरला. त्यांनी वृत्तपत्रांमध्ये याबाबत माहिती दिल्याचे सांगत, सरकारी संस्थांचे भगवेकरण करण्याचा भाजपने घाट घातला आहे, अशी टीकाही केली.

वाचा-हे खातेवाटप अंतिम नाही, राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

वाचा-पंकजा मुंडेंच्या आक्रमक भाषणावर धनंजय मुंडेंचा टोला, म्हणाले...

थेट संसदेत हा मुद्या उपस्थित केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं गंभीर दखल घेत प्रवक्ते रवीश कुमार यांनी लगेचच याबाबत स्पष्टीकरण दिले. रवीश कुमार यांनी, "हे चिन्ह आमचे राष्ट्रीय फुल आहे आणि बनावट पासपोर्ट शोधण्यासाठी आणलेल्या अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांपैकी हा एक भाग आहे." तसेच, आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाण संघटनेच्या आदेशानंतरच सेक्युरिटी फिचर्स छापलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच, कमळाच्या चिन्हाशिवाय इतर राष्ट्रीय प्रतीकांचादेखील यापुढे वापर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळं पुढच्या महिन्यात तुमच्या पासपोर्टवर एक वेगळे चिन्ह दिसू शकते.

वाचा-'संस्कृत' बोलल्याने डायबिटीज दूर होतो, भाजप खासदाराने सांगितला अनोखा उपाय!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2019 07:32 AM IST

ताज्या बातम्या