Home /News /national /

मॅट्रिमोनियल साईटवर पार्टनर शोधताय? प्रोफाइलची सत्यता कशी तपासाल?

मॅट्रिमोनियल साईटवर पार्टनर शोधताय? प्रोफाइलची सत्यता कशी तपासाल?

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी मॅट्रिमोनियल साईटवर आपलं नाव नोंदवलं असेल, तर त्यांना ही काळजी घ्यायला नक्की सांगा!

    नवी दिल्ली, 24 जानेवारी : मुलामुलींचे लग्न जुळवायची पारंपरिक पद्धत म्हणजे ‘वधुवर सूचक मंडळ’. सध्याच्या ऑनलाइनच्या जमान्यात वधुवर सूचक मंडळही आपला व्यवसाय ऑनलाईन केलाय. वेबसाईटवर जाऊन नाव रजिस्टर करायचं, आपली माहिती भरायची, अपेक्षा लिहायच्या आणि त्यात बसणारा मुलगा-मुलगी शोधायची. मुलामुलींच्या कामाची व्यस्तता, कमी झालेलं प्रत्यक्ष गाठी-भेटींचं प्रमाण, लग्न ठरवण्यासाठी आईवडिलांनी दिलेलं स्वातंत्र्य यामुळे सध्या ऑनलाइनच लग्न ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. अनेक मुलं-मुली स्वतःच यावर रजिस्ट्रेशन करतात आणि स्वतःसाठी योग्य असा जोडीदार निवडताना दिसतात. आपण या साईटवर आपली सगळी माहिती देतो पण अनेकदा त्याचा गैरवापर केला जातो. समोरच्याला खोटी ओळख सांगून लुबाडल्याचेही बरेच किस्से समोर येतात. अशा परिस्थितीत आपण ज्या व्यक्तीशी बोलतोय ती व्यक्ती खरी आहे की नाही याची माहिती असणं आवश्यक असतं. अशा मॅट्रिमोनियल साईटवर एखाद्याची खरी ओळख कशी शोधायची याबद्दलचे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे. हे ही वाचा-‘या’ सरकारी शाळेत मुलांनाही येते मासिक पाळी? संपूर्ण प्रकरण जाणून बसेल धक्का तुम्हीही स्वतःसाठी योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी मॅट्रिमोनियल साईटवर नाव नोंदवलं. त्यात काही जणांना शॉर्टलिस्ट करून त्यांच्याशी बोलणं सुरु केलं की तुमचा हळूहळू त्या व्यक्तीवर विश्वास बसू लागतो. याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला जर त्या व्यक्तीने पैसे मागितले तर ताबडतोब तिच्याशी बोलणं बंद करून त्या प्रोफाईलबद्दल कंपनीकडे रिपोर्ट करा. मॅट्रिमोनियल साईट हा आजकाल एक लोकांना लुबाडण्याचा मार्गच बनला आहे, त्यामुळे अशा साईट्सवर तुमच्याकडे पैशांची मागणी करणाऱ्या लोकांपासून लांबच राहा. अशा साईट्सवर रजिस्टर करून तुमचं प्रोफाईल बनवताना तुमचा फोटो अपलोड करायचा असतो. फोटोवरून व्यक्ती दिसायला कशी आहे, उंची किती आहे, रंग काय आहे अशा बऱ्याच गोष्टी समजू शकतात. त्यामुळे हा फोटो उपलोड करणं आवश्यक असतं. पण अनेकदा खोटे प्रोफाईल बनवणारे लोक फोटो अपलोड करत नाहीत, किंवा भलत्याच व्यक्तीचा फोटो अपलोड करतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो अशा बिनाफोटोची प्रोफाईल शॉर्टलिस्ट करू नका असाच सल्ला आम्ही देऊ. तसंच, तुमच्या ओळखीतील कोणाच्या फोटोचा गैरवापर होताना दिसत असेल तर त्याची लगेच तक्रार करा. फोटोसोबतच तुम्हाला तुमची काही खाजगी माहिती या साईटवर लिहावी लागते. ज्या प्रोफाईलवर ही माहिती नसेल तर त्या प्रोफाईलला शॉर्टलिस्ट करू नका. तसेच ज्यांनी ही माहिती भरली आहे त्या माहितीला पडताळून पहा आणि जर तुम्हाला जराशीही शंका आली तर पुढे जाण्यापूर्वी दोनदा विचार करा. याशिवाय जे लोक सारखं आपलं प्रोफाईल एडिट करत असतात, म्हणजे सतत फोटो बदलणं, जात बदलणं, अशा लोकांपासून सावध राहा. अशी प्रोफाईल्स बहुतांश वेळा खोटीच असतात.
    First published:

    Tags: Marriage, Online fraud

    पुढील बातम्या