News18 Lokmat

तब्बल 2.9 अब्ज डाॅलर इतका चालतोय 'सेक्स डॉल'चा व्यापार

ज्या प्रकारे माणसाला पोटाची भूक लागते तशीच शरीराला शारिरीक सुखाची भूक असते. ती भागवण्यासाठी चिनीच्या डब्‍ल्यूएमडॉल या कंपनीने सेक्स डाॅल तयार करत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2018 01:32 PM IST

तब्बल 2.9 अब्ज डाॅलर इतका चालतोय 'सेक्स डॉल'चा व्यापार

मनिषा पांडे, प्रतिनिधी

नवी दिल्ली, 31 आॅगस्ट : ज्या प्रकारे माणसाला पोटाची भूक लागते तशीच शरीराला शारिरीक सुखाची भूक असते. ती भागवण्यासाठी चिनीच्या डब्‍ल्यूएमडॉल या कंपनीने सेक्स डाॅल तयार करत आहे. या कंपनीचे संचालक दांग्यू यांग यांचं म्हणणं आहे की, या सेक्स डाॅल पत्नी आणि गर्लफ्रेंडची जागा घेऊ शकते. त्यामुळे तुम्हाला त्यांची गरज भासणार नाही असा दावाच त्यांनी केलाय.

जगभरात मोठ्या प्रमाणात सेक्स मार्केटचा प्रसार वाढतोय. असेच ग्राहक चिनी कंपन्यांच्या टार्गेटवर असतात ज्यांना सेक्स टाॅयमध्ये जास्त रस असतो. चीनची ही सेक्स डाॅल हुबेहुब महिलांसारखीच दिसते. तिची त्वचा, केस, नखं आणि पाय हे अगदी महिलांशी मिळते जुळते आहे. चांगली गोष्ट म्हणजे ती बोलणार नाही आणि कोणतीही हरकतही घेणार नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक संपूर्ण यंत्रणेसह तयार झालेली सेक्स डाॅलची किंमत ही जवळपास 2 लाख रुपये असल्याचं सांगितलं जातंय.

Loading...

आता किंमत कितीही असली तरी वासनाधारी पुरुषांमध्ये सेक्स डाॅलची प्रचंड मागणी आहे.  डब्‍ल्यूएमडॉलच्या माहितीनुसार, जगात सेक्स डाॅलचा उद्योग हा तब्बल 2.9 अब्ज डाॅलर इतका आहे.  कंपनीचा दावा आहे की, 2020 पर्यंत हाच आकडा 9.01 अब्ज डाॅलर इतका होईल असा दावा केलाय.

कंपनीने आता आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे बोलणारी डाॅलसुद्धा तयार करत आहे. ती तुम्हाला "हे बेबी, आय लव्ह यू" म्हणणार. सध्या ही डाॅल इंग्रजी आणि चायनिज भाषेत आय लव्ह यू म्हणतेय. जर तुम्हाला तुमच्या भाषेत वदवून घ्यायचं असेल तर तिला तसं शिकावंही लागणार आहे.

दुसरीकडे असंही म्हटलं जातंय की जगभरात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांना या डाॅलमुळे आळाही घालता येऊ शकतो.

देशात होणारे महिलांवरील अत्याचार, बलात्कार आणि महिलांचे शोषण या सेक्स डॉलमुळे कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एक अशी बाहुली जी एका रात्रीत पुरुषांच्या आयुष्यातली सगळी दुख कमी करू शकते. न्यायालयात सुरू असलेले अनेक खटले या डॉलमुळे बंद होऊ शकतात. अहो, इतकंच काय तर 498 अ हा कायदाच बंद होईल या सेक्स डॉलमुळे.

सेक्स डॉल आल्यानंतर कोणताची कटकट राहणार नाही कारण ती कधीही कोणत्याच गोष्टीसाठी नाही बोलणार नाही. तुम्हाला तिच्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही तिला तुमची भाषा शिकवू शकता. ही डॉल तेच करणार जे तुम्ही तिला सांगाल. त्यातही ती भारतीय भाषा लगेच शिकेल कारण ती मानवनिर्मित आणि कंम्प्यूटर्सवर चालणारी डॉल आहे.

या डॉलला फेमिनिजमचा फ पण माहित नाही. त्यामुळे माझा अधिकार, माझा स्पेस, माझा आनंद, माझं आयुष्य आणि माझे निर्णय याबद्दल ती कधीच काही बोलणार नाही. त्यामुळे असा काही विज्ञानाचा चमत्कार झालाच तर त्याने खरचं काही प्रश्न सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2018 01:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...