भयावह! काशीमध्ये मृतदेहाला अग्नी देण्यासाठी लांबच्या लांब रांगा; 5 ते 6 तास करावी लागतेय प्रतीक्षा

भयावह! काशीमध्ये मृतदेहाला अग्नी देण्यासाठी लांबच्या लांब रांगा; 5 ते 6 तास करावी लागतेय प्रतीक्षा

Corona Deaths in India: देशात अनेक ठिकाणी स्मशानभूमीत मृतदेहांना अग्नी देण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागत आहेत. तर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना 5 ते 6 तास वाट पाहावी लागत आहे.

  • Share this:

वाराणसी, 16 एप्रिल: देशात कोरोना विषाणूची स्थिती (Corona Pandemic) भयावह बनत चालली आहे. देशात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेडसोबतचं इतरही वैद्यकीय सुविधांसाठी ओढाताण करावी लागत आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या स्ट्रेनमध्ये (corona virus 2nd wave) रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही (Corona death) वाढत आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी स्मशानभूमीत मृतदेहांना अग्नी देण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागत आहेत. अशीच काहीशी स्थिती काशीमध्ये पाहायला मिळत आहे. याठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना 5 ते 6 तास वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाची भीती अधिक वाढत चालली आहे.

सर्वात भयावह स्थिती काशीतील हरिश्चंद्र घाटावर बनली आहे. याठिकाणी दोन पद्धतीनं मृतदेहाला अग्नी दिला जातो. एकेठिकाणी मृतदेहाला अग्नी देण्यासाठी पारंपरिक पद्धतीनं लाकडाचा वापर केला जातो, तर दुसऱ्या ठिकाणी सीएनजी पद्धतीनं अंत्यसंस्कार उरकला जातो. याचठिकाणी सीएनजी स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार केला जातो. पण सध्या याठिकाणी दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना विषाणूमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांना याठिकाणी मोठ्या संख्येनं आणलं जात आहे. अगदी घाटापासून पायऱ्यांपर्यंत मृतदेह ठेवलेले नजरेस पडत आहेत.

(हे वाचा- हरिद्वार कुंभ समाप्तीची घोषणा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निरंजनी आखाड्याचा निर्णय)

काही लोकांच्या मते, ज्या रुग्णांचा खाजगी रुग्णालयात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होतं आहे, अशा रुग्णांना सामान्य पद्धतीनं लाकडाचा वापर करत अंत्यसंस्कार केले जात आहेत. पण सामान्य मृतदेहांवरच पारंपरिक पद्धतीनं अंत्यसंस्कार केले जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे. तसेच कोरोना रुग्णांवर केवळ सीएनजी पद्धतीनं अंत्यसंस्कार केले जात आहेत, असंही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

असं असलं तरी, घाटावर अनेक ठिकाणी वापरलेले पीपीई किट पडलेले आहेत. त्यामुळेही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होतं आहे. शिवाय सामान्यपणे मृत्यू होणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांदेखील 5 ते 6 तास वाट पाहावी लागत आहे. गेल्या पाच दिवसांपासून याठिकाणी तीन पट रुग्णांची वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच अनेकदा मृतदेहाला अग्नी देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडाचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.

Published by: News18 Desk
First published: April 16, 2021, 8:17 AM IST

ताज्या बातम्या