टाईट जीन्स घालून ड्रायव्हिंग करणं पडलं महागात, झाला गंभीर आजार

टाईट जीन्स घालून ड्रायव्हिंग करणं पडलं महागात, झाला गंभीर आजार

सध्याची फॅशन काही औरच आहे. हल्ली टाईट आणि टोन जिन्सचा जमाना आहे. त्यामुळे टाईट जीन्स घालणाऱ्यांनी ही बातमी नक्की वाचा.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : बऱ्याच वेळ टाईट जीन्स घालणे हे अत्यंत हानिकारक आहे. याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. दिल्लीतील एका 30 वर्षीय तरूणाला घट्ट जीन्स घालून लांब गाडी चालवावी लागली. त्यामुळे अल्पावधीतच त्यांना एक गंभीर आजार झाला आहे. सध्याची फॅशन काही औरच आहे. हल्ली टाईट आणि टोन जिन्सचा जमाना आहे. त्यामुळे टाईट जीन्स घालणाऱ्यांनी ही बातमी नक्की वाचा.

खरंतर, दिल्लीत राहणारा 30 वर्षीय सौरभ शर्मा यांना फिरायला खूप आवडतं. परंतु, घट्ट जीन्स घालून आणि लांब ड्राईव्ह केल्यामुळे त्यांना अशी समस्या निर्माण झाली की त्यांना आजारातून बाहेर येण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. डॉक्टरांच्या अफाट प्रयत्नांमुळे त्यांचे आयुष्य वाचले आहे.

इतर बातम्या- मरताना वहिनीने दिला धक्का, माझ्या मुलीचा खरा बाप तूच हे भावाला सांग!

गेल्या 12 ऑक्टोबर रोजी, बराच वेळ घट्ट जीन्स घालून कार चालविल्यामुळे त्यांच्या पायातील रक्त गोठले. ज्यामुळे त्यांना पलमोनरी एम्बोलिझम नावाचा आजार झाला. हा रोग जीवघेणा ठरू शकतो असे डॉक्टरांनी सांगितले होतं. ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नवीन भामरी म्हणाले की, सौरभ योग्य वेळी रुग्णालयात पोहोचू शकला नाही तर त्याचा जीव वाचविणे अवघड झालं असतं.

इतर बातम्या - देवा! खात्यातून काढत होता कोणा दुसऱ्याचे पैसे, म्हणाला- मला वाटलं मोदींनी टाकले

अशा प्राणघातक आजारातून वाचलेले सौरभ आता तरूणांना सल्ला देत आहेत. ते म्हणतात की, जर तुम्ही घट्ट जीन्स घातली असाल तर तुम्ही खूप काळजी घेणे आवश्यक आहे. आणि घट्ट जीन्स घालून मुळीच ड्राईव्ह करू नका असंही ते सगळ्यांना सांगतात.

इतर बातम्या - 'रड्या ऑफ द ईयर अवार्ड संज्यालाच दिला पाहिजे'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2019 08:09 AM IST

ताज्या बातम्या