लंडनच्या क्रीडा व्यवसाय परिषदेत गाजलं नीता अंबानींचं भाषण

लंडनच्या क्रीडा व्यवसाय परिषदेत गाजलं नीता अंबानींचं भाषण

क्रीडा, विज्ञान, राजकारण, समाजकारण, कॉर्पोरेट क्षेत्र, हॉलिवूड, बॉलिवूड या सर्वच क्षेत्रांत महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत प्रगती केली आहे, असं रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी म्हणाल्या.

  • Share this:

लंडन, 8 ऑक्टोबर : लंडनमधल्या क्रीडा व्यवसाय शिखर परिषदेत रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी भाषण केलं. मुंबई इंडियन्सने क्रिकेटचा प्रसार करण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली, असं त्या म्हणाल्या.भारताल्या महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत, असं त्यांनी सांगितलं. नीता अंबानी या मुंबई इंडियन्स या टीमच्या मालक आहेत. रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक उपक्रमांमध्ये मोठं योगदान दिलं आहे.

क्रीडा, विज्ञान, राजकारण, समाजकारण, कॉर्पोरेट क्षेत्र, हॉलिवूड, बॉलिवूड या सर्वच क्षेत्रात महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत प्रगती केली आहे हे त्यांनी ठासून सांगितलं. भारताने खेळाच्या क्षेत्रात कशी भरारी घेतली आहे याबद्दलही त्यांनी या भाषणात सांगितलं.

(हेही वाचा : 'भारतीय महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर',लंडनमध्ये नीता अंबानींचे गौरवोद्गगार)

=============================================================================================

VIDEO : नीता अंबानी यांचं लंडनमध्ये क्रीडा व्यवसाय शिखर परिषदेत भाषण

First published: October 8, 2019, 8:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading